IPL 2022, Mega Auction, Ishan Kishan: इशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू, 15.25 कोटी रुपये मोजून कोणी केलं खरेदी?
बंगळुरु: यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन हा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कारण इशान किशनसाठी मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज यांनी जोरदार बोली लावली. मात्र अखेर मुंबई इंडियन्सनेच (MI) ईशान किशनवर तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने आजवर पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर लिलावात […]
ADVERTISEMENT
बंगळुरु: यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन हा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कारण इशान किशनसाठी मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज यांनी जोरदार बोली लावली. मात्र अखेर मुंबई इंडियन्सनेच (MI) ईशान किशनवर तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलं.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सने आजवर पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूवर लिलावात 10 कोटींहून अधिकची बोली लावली आहे. मुंबईसाठी इशान किशन सातत्याने जबरदस्त खेळ दाखवत होता. किशनसाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बराच वेळ बोली सुरु होती. अखेर मुंबई इंडियन्सने 15.25 रुपयांची सर्वाधिक बोली लावली आणि इशान किशनला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये घेतलं. मुंबईशिवाय हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज देखील किशनसाठी बोली लावली होती.
मात्र, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याच्या बोलीचा विक्रम मोडता आला नाही. 2015 च्या मोसमात युवराज सिंगला दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
हे वाचलं का?
आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या लिलावात किशनच्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरवर 12.25 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र आतापर्यंत जो लिलाव पार पडला आहे त्यामध्ये इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननेही आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले आहे. इशान किशनने याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 61 सामने खेळले असून, त्याने 136 च्या स्ट्राइक रेटने 1452 धावा केल्या आहेत. याआधी किशनला मुंबईने 6.20 कोटींमध्ये राखून ठेवले होते. या लिलावात किशनला तब्बल 146% ची वाढ मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT