IPL 2022 Mega Auction : ‘या’ तारखेला बंगळुरुत रंगणार लिलाव, ५९० खेळाडू रिंगणात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी पंधराव्या हंगामासाठी पार पडणाऱ्या मेगा ऑक्शनची तारीख आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने जाहीर केली आहे. १२ आणि १२ फेब्रुवारीला बंगळुरुत हा लिलाव पार पडला जाणार असून, दोन दिवस चालणाऱ्या या मेगा ऑक्शनमध्ये ५९० खेळाडू लिलावासाठी रिंगणात उतरताना पहायला मिळतील.

१५ व्या हंगामासाठी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक संघ मालकांनी आपल्या संघात काही खेळाडूंना कायम राखलेलं असून अनेक दिग्गज खेळाडूंना लिलावात आपलं नशिब आजमवावं लागणार आहे.

IPL 2022 बाबत जय शाह यांनी केली अत्यंत मोठी घोषणा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू हे Capped तर ३५५ खेळाडू Uncapped आहेत. याव्यतिरीक्त ७ खेळाडू हे संलग्न देशांचे आहेत. यंदाच्या लिलावात श्रेयस अय्यर, शिखर धवन, रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव अशा अनुभवी आणि तरुण खेळाडूंवर पुन्हा एकदा बोली लागणार आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या यश धुल, विकी ओत्सवाल, राजवर्धन हांगर्गेकर या तरुण खेळाडूंनाही लिलावात स्थान मिळालं आहे. त्यामुळे यंदा कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

IPL 2022 भारतातच होणार, पण… पाहा BCCI च्या सूत्रांनी काय दिली माहिती

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT