IPL 2022 : गिलचा हा कॅच पाहून तुम्हालाही येईल कपिल देवची आठवण, पाहा हा व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपरजाएंट या दोन नवीन संघांचा पहिला सामना आज खेळवला गेला. पहिल्यांदा बॅटींग करताना लखनऊने दीपक हुडा, आयुष बदोनीचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर १५८ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात चर्चा झाली ती पहिल्या इनिंगमध्ये गुजरातच्या शुभमन गिलने पकडलेल्या थरारक कॅचची.

ADVERTISEMENT

सामन्यात चौथ्या ओव्हरला वरुण अरॉनच्या बॉलिंगवर वेस्ट इंडिजच्या एविन लुईसने मिड विकेटच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुभमन गिलने पाठीमागे धावत जाऊन हा कॅच पकडला. गिलचा हा कॅच पाहून अनेकांना १९८३ च्या विश्वचषकातील कपिल देव यांनी पकडलेल्या कॅचची आठवण आली.

सर्वात आधी, मोहम्मद शमीने आपल्या आऊट स्विंगच्या जोरावर लोकेश राहुलला माघारी धाडलं. यानंतर शमीने क्विंटन डी-कॉकलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. टी-२० विश्वचषकातल्या निराशाजनक कामगिरीनंतर मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली होती. यानंतर आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात खेळताना शमीने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

हे वाचलं का?

IPL 2022 : नवीन संघाची सुरुवात शून्याने, पहिल्याच बॉलवर शमीने राहुलला बनवलं बकरा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT