Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बनला पहिला बॅटमिंटनपटू

मुंबई तक

ADVERTISEMENT

lakshya sen first badmintton player enter mens badminton semi final fight with chou tien chen paris olympic 2024
लक्ष्यने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या लक्ष्य सेनेने इतिहास रचला आहे.

point

लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा पराभव केला

point

लक्ष्यने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.

Paris Olympics 2024 Day 7, Lakshya Sen : बॅटमिंटनच्या पुरूष एकेरी स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनेने इतिहास रचला आहे. लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा 19-21, 21-15, 21-12 असा पराभव केला आहे. हा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला भारतीय पुरूष खेळाडू ठरला आहे. लक्ष्य सेनेच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात एक मेडल पक्क मानलं जात आहे. (lakshya sen first badmintton player enter mens badminton semi final fight with chou tien chen paris olympic 2024) 

ADVERTISEMENT

लक्ष्यने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा 19-21, 21-15, 21-12 असा पराभव केला. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य हा पहिला भारतीय पुरुष शटलर आहे. लक्ष्यने पहिला गेम गमावला, पण दुसऱ्या गेममध्ये त्याने पुनरागमन केले. त्यानंतर निर्णायक गेम जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024: उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव, भाजपला आणणार अडचणीत?

पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेनची सुरुवात खराब झाली. त्याने पहिले दोन गुण गमावले. पण त्यानंतर त्याने बरोबरी साधली. इथून पुढे 15 गुणांपर्यंत लक्ष्य कधी पिछाडीवर पदायचा तर कधी बरोबरी साधायचा. पण यानंतर त्याने पल्यांदाच तैपेईच्या खेळाडूला मागे टाकले आणि तीन गुणांची आघाडी घेऊन स्कोअर 18-17 केला. पण ही आघाडी त्याला कायम ठेवता आली नाही. चेन चौ तिएनने लक्ष्यची आघाडी मोडीत काढली आणि पुढे सलग तीन गुण मिळवून पहिला गेम 18-21 ने जिंकला. या गेमनंतर लक्ष्य सामन्यात 0-1 ने पिछाडीवर पडला.

हे वाचलं का?

दुस-या गेममध्ये लक्ष्य सेनने झुंझार पुनरागमन केले. त्याने हा गेम 21-15 ने जिंकला. यासह सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली गेली.तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेन आणि चाऊ तिएन चेन यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्याच्या सुरुवातीला लक्ष्यने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर चौ तियान चेनने पुनरागमन करत काही महत्त्वाचे गुण मिळवले. शेवटी लक्ष्यने आपला संयम राखला आणि गेमसह सामना जिंकला

हे ही वाचा : Manoj jarange : 'फडणवीसांना मला...', कोर्टातून बाहेर पडताच जरांगे पुन्हा संतापले!

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT