Manoj jarange : 'फडणवीसांना मला...', कोर्टातून बाहेर पडताच जरांगे पुन्हा संतापले!
Manoj Jarange News : माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो मी फडणवीस यांचं स्वप्न हा कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत आहेत
मी न्यायालयच आदर करतो आणि करत राहणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही.
Manoj Jarange On Devendra Fadnavis : ओंकार वाबळे, पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने ते हजर झाले होते. या प्रकरणात पुणे कोर्टाने (Pune Court) त्यांना दिलासा होता. या घटनेनंतर जरागेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याला मला गुंतवायचं, पण त्याचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही, असा आरोप करत टीका केली. (manoj jarange criticize devendra fadnavis maratha reservation pune court in drama product cheat case)
मनोज जरांगे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की,उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे.आणि यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे. मला कायद्याचा संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे म्हणून मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे, असे जरांगेंनी सांगितले.
हे ही वाचा : Narayan Rane : ''मातोश्री'त बसून धमकीची भाषा करणारे...', ठाकरेंवर राणे कडाडले!
माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो मी फडणवीस यांचं स्वप्न हा कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे जरांगेंनी यावेळी ठणकावून सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकरांवर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही त्यांना मानतो आणि मानत राहणार आहे.त्यांनी काय टीका करावी काय करू नये हा त्यांचा अधिकार आहे.ते आमच्या बाजूने लढतील याची आम्हाला आशा असून आम्ही त्यांना मानतो.
जरांगेंनी यावेळी भुजबळांवर देखील टीका केली. ओबीसी आमचे दुश्मन नाही आणि मी अस कधीचं म्हटलेलं नाही ग्रामीण भागातील एकही दलित आदिवासी लोकांना बोललेलो नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत आहेत, असा हल्ला जरागेंनी भुजबळांवर चढवला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नवीन वेबसाईटवर कसा भरायचा अर्ज?
मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला. मी न्यायालयच आदर करतो आणि करत राहणार आहे.न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे त्या बाबत मी आत्ता काहीच बोलणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांच मला गुंतवायचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही, असे जरागेंनी स्पष्टच सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT