Narayan Rane : ''मातोश्री'त बसून धमकीची भाषा करणारे...', ठाकरेंवर राणे कडाडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

 narayan rane criticize uddhav thackeray on pm narendra modi criticism maharashtra politics
खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'ठाकरेंची औकात आणि लायकी नाही'

point

'उद्धव वाकड्यात शिरले तर चोख उत्तर देऊ'

point

'उद्घव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे'

Narayan Rane Criticize Uddhav Thackeray : शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. मातोश्रीत बसून धमकीच्या भाषा षंढच करू शकतो, अशी टीका राणेंनी ठाकरेंवर केली आहे. (narayan rane criticize uddhav thackeray on pm narendra modi criticism maharashtra politics) 

ADVERTISEMENT

नारायण राणे यांनी एक लेटर एक्सवर पोस्ट केले आहे. या लेटरमधून नारायण राणे यांनी ठाकरेंवर जोरदार निषाणा साधला आहे. ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रासाठी कलंक होते. त्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्र राज्य हे 10 वर्ष मागे गेल्याच्या दावा राणेंनी केला. तसेच मातोश्रीत बसून धमकी देण्याची भाषा षंढच करू शकतो, अशी घणाघाती टीका राणेंनी ठाकरेंवर केली आहे. तसेच या लेटरमध्ये नारायण राणे काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नवीन वेबसाईटवर कसा भरायचा अर्ज?

राणेंचे ते लेटर जसच्या तसं... 

उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीन नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

हे वाचलं का?

माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे उद्गगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देऊन भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. 

आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो. आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते.  आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात  जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावीशी वाटते. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Supreme Court : औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर होणार का...सुप्रीम कोर्टाने काय दिला निकाल?

काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पूरे होऊ देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्व:ताचे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप व आरएसएस त्यांच्यासोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT