Vidhan Sabha Election 2024: उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव, भाजपला आणणार अडचणीत?

मिथिलेश गुप्ता

मुंबई नजीकच्या उल्हासनगरमध्ये शरद पवार हे आता विधानसभा निवडणुकीसाठी नवा डाव टाकू शकतात. जाणून घ्या येथे नेमकं काय राजकारण सुरू आहे.

ADVERTISEMENT

उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव
उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानी यांचे गोव्यात अधिवेशन...

point

पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार

point

अधिवेशनाला पप्पू कलानी यांच्यासह राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

उल्हासनगर: महाराष्ट्र के उल्हासनगरचे चार वेळा आमदार असलेले आणि शरद पवारांचे प्रमुख नेते असलेले पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आता उल्हानगर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यासंदर्भात टीम ओमी कलानीने गोव्यात अधिवेशन घेतलं आणि जाहीरनामा जाहीर केला आहे. या अधिवेशनात पप्पू कलानी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची विशेष उपस्थिती दिसून आली. त्यामुळे माढा पाठोपाठ उल्हासनगरमध्येही शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. (vidhan sabha election 2024 will sharad pawar make a new move in ulhasnagar too will he bring bjp into trouble)

ओमी कलानी यांनी सांगितले की, त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची आहे, मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उल्हासनगरमधून भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात आता ओमी कलानी हे निवडणूक लढवणार आहेत त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

हे ही वाचा>> माढ्यात मोहितेंनंतर पवारांचा दुसरा डाव! अजितदादांना धक्का, शिंदेंना घरातूनच चॅलेंज?

ओमी कलानी आणि पप्पू कलानी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. पण आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाला हजेरी लावली होती. पण त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिकिटाबद्दल कोणतेही भाष्य केले नाही आणि आम्ही फक्त शरद पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, तिकीट शरद पवारच ठरवतील. 

TOK ने गोव्यात स्थानिक नगरसेवक, व्यापारी आणि शहरातील अनेक नेत्यांसह अधिवेशन आयोजित केले आणि 18 सदस्यांची (टीम ओमी कलानी) एक कोअर कमिटी स्थापन केली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.जयराम लुल्ला यांना TOK अध्यक्ष करण्यात आले आहे. TOK च्या कोअर कमिटीमध्ये व्यापारी, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांसह सर्व समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp