The Flying Sikh मिल्खा सिंग यांचं Corona मुळे निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

The Flying Sikh मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुमारे महिनाभर त्यांची कोरोनासोबत झुंज सुरू होती. मात्र अखेर रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच्या त्यांच्या पत्नीचं म्हणजे निर्मल यांचंही कोरोनामुळे निधन झालं. आता मिल्खा सिंग हेदेखील काळाच्या पडद्याआड गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग कोरोना निगेटिव्हही झाले होते. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली.

ADVERTISEMENT

प्रकृती खालावल्यानंतर मिल्खा सिंग यांना चंदीगढ येथील PGI रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं. मिल्खा सिंग यांनाही कोरोना झाल्याने ते पत्नीच्या अंत्यसंस्कारांसाठीही जाऊ शकले नाहीत. त्यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा मिल्खा सिंग हेच ICU मध्ये होते. चंदीगढच्या PGIMER रूग्णालयाने एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

मिल्खा सिंग यांना 3 जून रोजी PGIMER रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 13 जूनपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची टेस्ट निगेटिव्हही आली. मात्र कोव्हिड बरा झाल्यानंतर जी लक्षणं जाणवतात त्यामध्ये त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्यांना कोव्हिड रूग्णालयातून मेडिकल आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचं पथक त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होतं. मात्र चिंताजनक स्थितीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. असं या स्टेटमेंटमध्ये रूग्णालयाने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. आपल्या देशाने एक महान खेळाडू गमावला आहे असं ट्विट करत मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मागच्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. घरी आल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. ज्यानंतर त्यांना PGIMER रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मिल्खा सिंग यांचे विक्रम

मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी पंजाबच्या गोविंदपुरामध्ये झाला. फाळणीच्या नंतर हे शहर आता पाकिस्तानात आहे. 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6 सेकंदात पूर्ण केली. 1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा सिनेमाही आला होता. हा त्यांचा चरित्रपट होता. अभिनेता फरहान अख्तरने यामध्ये मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. स्वतः मिल्खा सिंग यांची त्याने भेटही घेतली होती आणि हा सिनेमा त्यांनाही आवडला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT