Mumbai Indians साठी वाईट बातमी! बुमराह आयपीएल, वर्ल्ड कप खेळणं अवघड
Jasprit Bumrah injury : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल 2023 (IPL 2023) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळण्याची शक्यता खूप कमी वाटत आहे. त्याची दुखापत अत्यंत गंभीर (injury) असल्याचे सांगण्यात येत आहे. जसप्रीत बुमराह पाच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे आणि सध्या त्याचे पुनरागमन होताना दिसत नाही. मार्च ते मे या कालावधीत होणाऱ्या आयपीएल 2023 साठी […]
ADVERTISEMENT
Jasprit Bumrah injury : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल 2023 (IPL 2023) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळण्याची शक्यता खूप कमी वाटत आहे. त्याची दुखापत अत्यंत गंभीर (injury) असल्याचे सांगण्यात येत आहे. जसप्रीत बुमराह पाच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे आणि सध्या त्याचे पुनरागमन होताना दिसत नाही. मार्च ते मे या कालावधीत होणाऱ्या आयपीएल 2023 साठी तो फिट नसल्याची माहिती आहे. परिस्थिती अशी आहे की जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणारी WTC फायनलही दूरची वाटते. मात्र, भारताला अजूनही WTC फायनलसाठी पात्र ठरायचे आहे. बुमराह भारताकडून शेवटचा सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो (Australia) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत खेळताना दिसला. पण दुखापतीने त्याला आशिया कप 2022 आणि T20 वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांपासून दूर राहावे लागले होते. Bad news for mumbai Indians team
ADVERTISEMENT
IPL 2023 : चेन्नई-गुजरात भिडणार! 31 मार्चपासून IPL, फायनल कोणत्या तारखेला?
क्रिकबझने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की बुमराहला सध्या कोणत्याही प्रकारचे आराम वाटत नाही. तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहण्याच्या मार्गावर आहे. सध्या भारतीय संघासमोर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी तयारी करण्याचे लक्ष्य आहे. याआधी आशिया चषकही होणार आहे पण त्यासाठी बुमराहवर भर दिला जाणार नाही.
हे वाचलं का?
बुमराहचा जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. पण परत येण्यापूर्वीच दुखापत वाढली आणि तो बाहेर पडला. यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो, असे मानले जात होते. पण त्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून मंजुरी मिळाली नसल्याची बातमी आहे. NCA त्याच्याबाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही आणि त्याच्या पूर्ण बरी होण्याची प्रतीक्षा करत आहे.
IPL Mini Auction 2023 : पाहा कोणता खेळाडू गेला कुठल्या संघात?
ADVERTISEMENT
यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसेल ही आशा संपुष्टात आली आहे. मात्र अधिकृत वृत्ताची अद्याप प्रतीक्षा आहे. यापूर्वी असे मानले जात होते की तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. येथे फक्त चार षटके टाकावी लागतील, त्यामुळे कामाचा ताण जास्त नसेल. पण बुमराहची तब्येतही अशी नाही की तो चार षटके टाकण्याची जबाबदारीही घेऊ शकेल. अशा परिस्थितीत बीसीसीआय या खेळाडूबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT