Rishab Pant : “माझा रेकॉर्ड खराब नाही”; लाईव्ह मुलाखतीत ऋषभ पंत हर्षा भोगलेशी भिडला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या न्यूझीलंड दौऱ्यावरच्या खराब फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ऋषभ पंतला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळत असून संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले आहे. सतत निशाणा साधला जात असताना, ऋषभ पंतने स्वत: त्याच्या फॉर्मबद्दल बोललं आहे आणि थेट म्हटले आहे की, माझे रेकॉर्ड खराब नाहीत. समालोचक हर्षा भोगले यांच्या मुलाखतीत ऋषभ पंत काहीसा नाराज असल्याचे दिसले, मात्र हे विधान केल्यानंतर काही वेळातच तिसऱ्या वनडेत ऋषभ पंत केवळ 10 धावा करून बाद झाला.

ADVERTISEMENT

बॅटिंग ऑर्डरबद्दल काय म्हणाला?

सामन्यापूर्वी समालोचक हर्षा भोगलेने ऋषभ पंतशी संवाद साधला. ऋषभने येथे सांगितले की, मला टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला यायला आवडेल, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 किंवा 5 क्रमांक बरोबर आहे आणि कसोटीमध्ये मी 5 क्रमांकावर फलंदाजी करतो. पण प्रशिक्षक आणि कर्णधार संघासाठी कसा चांगला विचार करतात यावर गोष्टी अवलंबून असतात. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.

‘आता माझी तुलना करू नका’

या संभाषणादरम्यान हर्षा भोगले म्हणाले की, कसोटीत तुझी रँकिग चांगली आहे, पण एकदिवसीय आणि टी-20मध्ये इतकी चांगली नाही. ज्यावर ऋषभ पंत म्हणाला की, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये माझे आकडे इतके वाईट नाहीत, मी फक्त 24-25 वर्षांचा आहे आणि अशा परिस्थितीत तुलना करणे योग्य नाही. माझे वय ३०-३२ असेल तेव्हा अशी तुलना करता येईल. यादरम्यान ऋषभ पंत अस्वस्थ होताना दिसला आणि हर्षा भोगलेला उत्तर देताना त्याचा सूर बदलला.

हे वाचलं का?

ही मुलाखत पाहताच ती व्हायरल झाली आणि समालोचक हर्षा भोगले यांच्याशी तो ज्या पद्धतीने बोलला ते लोकांना आवडलं नाही. ऋषभ पंतचा हा अहंकार आहे, जो त्याने संभाळावा, असे अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे. याशिवाय एका प्रश्नावर ऋषभ पंतला राग कसा आला, असे अनेकांनी सांगितले.

विशेष म्हणजे ऋषभ पंतला टी-२० विश्वचषकातही दोन संधी मिळाल्या, पण त्यात तो अपयशी ठरला. यानंतर न्यूझीलंड दौराही त्याच्यासाठी चांगला गेला नाही, त्यामुळे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील एक वर्षात विश्वचषक आहे, अशा परिस्थितीत आतापासूनच विचार सुरू झाला आहे.मात्र, प्रत्येक वेळी संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला मॅच विनर म्हणत त्याला पाठिंबा देण्याचे बोलले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा यांनी अनेकदा याचा उल्लेख केला आहे, टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही ऋषभ पंतला न्यूझीलंड दौऱ्यावर मॅच विनर म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT