'लग्न कधी करणार?', गावी पोहोचताच मनू भाकरनं दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाली?
Manu Bhaker Latest Video : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदकांवर विजयाची मोहोर उमटवणारी भारताची स्टार शूटर मनू भाकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव झालेल्या मनू भाकरचं तिच्या गावकऱ्यांनीही जंगी स्वागत केलं. गेल्या काही दिवसांपासून मनू भाकरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनू भाकरने लग्नाबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय
मनू भाकरचं गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
मनू भाकरचा गावाकडचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Manu Bhaker Latest Video : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदकांवर विजयाची मोहोर उमटवणारी भारताची स्टार शूटर मनू भाकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव झालेल्या मनू भाकरचं तिच्या गावकऱ्यांनीही जंगी स्वागत केलं. गेल्या काही दिवसांपासून मनू भाकरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मनूनं मोठं विधान केल आहे. मनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मनूने हरियाणातील तिच्या झज्जर गावाला नुकतीच भेट दिली. (India's star shooter Manu Bhakar, who won two bronze medals in Paris Olympics 2024, is once again in the limelight. Manu Bhakar, who was showered with praise from all over the world, was warmly welcomed by her villagers)
"मी फिल्मी जगापासून दूर राहील आणि करिअर बनवण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसच देशासाठी मेडल जिंकण्याचा प्रयत्न करत राहील", असं मनूनं माध्यमांशी बोलताना म्हटलं. मनूने झज्जर येथील एका गोकुलधाममध्येही भेट दिली. यावेळी तिच्यासोबत तिची आई सुमेधा आणि वडील रामकिशनही होते. जिल्हा उपायुक्त शक्ती सिंग आणि एडीसी सलोनी शर्माच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासनाने मनुचं स्वागत केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना मनू भाकर काय म्हणाली?
मनू भाकरने माध्यमांशी बोलताना बॉलिवूडमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मनू म्हणाली, मला माझा खेळ खूप पसंत आहे. काही काळानंतर मी थोडीफार कोचिंगही करेल. लग्नाच्या प्रश्नावर मनूने म्हटलं की, आता याविषयी काही विचार केला नाहीय. देव जे काही करेल, तेच पुढे होईल.
ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हुकलं, यावर मनू म्हणाली, प्रत्येक जण गोल्ड मेडलसाठी खेळतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही गोल्ड मेडल जिंकण्याची आशा होती. भविष्यात गोल्ड मेडल जिंकण्यासाठी कांस्य पदक प्रेरणादायी ठरेल. मी आता तीन महिन्यांसाठी खेळातून विश्रांती घेणार आहे. पाच महिन्यानंतर जी स्पर्धा होईल, त्यात मी सहभागी होईल. सरकारकडूनही प्रत्येक स्तरावर सहकार्य मिळालं. गोल्ड मेडलचं स्वप्न असतं. पण चूक झाल्यावर दु:ख होतं. इथपर्यंत पोहोचण्यात गावासह देशातील प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT