Neeraj Chopra: नीरज चोप्रानं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला पण मिळाले ‘रौप्य पदक’; स्पर्धेदरम्यान काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. असे असूनही त्याला सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज चौप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनलंडमध्ये होत असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.03 मीटर लांब भाला फेकला, त्यापूर्वी त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकला होता, ज्यामुळे त्याला गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले होते.

ADVERTISEMENT

ऑलिम्पिकनंतर 10 महिन्यांनी नीरज चोप्राची ही पहिलीच स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात त्याने 86.92 मीटर भाला फेकला. तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नातही त्याने खूप प्रयत्न केले, पण त्याला केवळ 85.85 मीटरच भाला फेकता आला. 24 वर्षीय नीरज चोप्राने शानदार पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सराव केला होता.

पावो नूरमी ही जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. ही डायमंड लीग नंतरची सर्वात मोठी ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा मानली जाते. 89.93 मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या फिनलंडच्या ऑलिव्हियर हेलँडरला सुवर्णपदक मिळाले. या खेळांमध्ये सहभागी होणारा नीरज हा एकमेव भारतीय खेळाडू होता. या रौप्य पदकाने नीरज चोप्राचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्याकडून कामगिरी अपेक्षित आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT