T-20 World Cup : ४ वर्षांनी Ashwin चं संघात पुनरागमन, सोशल मीडियावर शेअर केला भावूक मेसेज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केलं आहे.

ADVERTISEMENT

तब्बल ४ वर्षांनी आश्विनने भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. २०१७ साली आश्विन आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता.

‘टीमचा चाणक्य ड्रेसिंग रुममध्ये’! T-20 World Cup साठी धोनी संघाचा मेंटॉर, सोशल मीडियावर फॅन्स आनंदात

हे वाचलं का?

या संघनिवडीनंतर रविचंद्रन आश्विनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक भावूक मेसेज पोस्ट केला आहे. प्रत्येक बोगद्याच्या शेवटी तुम्हाला प्रकाश सापडतोच पण हा प्रकाश त्यांनाच मिळतो ज्यांचा प्रकाशावर विश्वास असतो असा संदेश आश्विनने आपल्या घरातील भितींवर लिहीला आहे.

रविचंद्रन आश्विन हा उपयुक्त टी-२० बॉलर म्हणून ओळखला जातो. आजवर आश्विनने २५२ टी-२० सामन्यांमध्ये २४९ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये आश्विन दिल्ली संघाचं प्रतिनिधीत्व करतो. अनेकदा त्याने दिल्लीकडून गोलंदाजीदरम्यान डावाची सुरुवात केली आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसल्यामुळे त्याच्या जागेवर आश्विनला संघात जागा मिळाली आहे.

ADVERTISEMENT

जय शहांच्या डोक्यात कल्पना आली आणि…जाणून घ्या T-20 World Cup साठी MS Dhoni कसा बनला संघाचा मेंटॉर?

ADVERTISEMENT

असा असेल टीम इंडियाचा संपूर्ण संघ –

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (दोघेही यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँडबाय वर असलेले प्लेअर – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT