रोहित नेहमी संघाच्या हिताचा विचार करतो, Virat ला कॅप्टन्सीवरुन हटवण्याचा निर्णय योग्यच – रवी शास्त्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना बीसीसीआयने धक्कातंत्र आजामावलं आहे. विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी करताना बीसीसीआयने रोहित शर्माला संघाचं नेतृत्व सोपवलं आहे.

ADVERTISEMENT

महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही बीसीसीआयचा विराटला कॅप्टन्सीवरुन हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

कॅप्टन्सी सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी, Virat कडून तरीही निर्णय न आल्याने BCCI कडून नेतृत्वबदल

हे वाचलं का?

‘द विक’ ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्रींनी विराटला कॅप्टन्सीवरुन हटवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. “रोहित शर्मा नेहमी तेच करतो जे संघासाठी चांगलं असतं. तो संघातील प्रत्येक खेळाडूचा पुरेपूर फायदा करवून घेतो. रोहित आणि विराट कोहली वन-डे आणि कसोटी क्रिकेटमधले महान फलंदाज आहेत. या संघाकडे सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहेत. ज्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मैदानात हरवलं आहे.”

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचं नातं जवळचं मानलं जातं. २०१७ साली चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानने भारताला हरवल्यानंतर तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहलीत झालेल्या वादानंतर रवी शास्त्रींना बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली होती. युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. ज्यानंतर बीसीसीआयने त्यांना मुदतवाढ न देता राहुल द्रविडकडे संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे.

ADVERTISEMENT

Rohit Sharma ODI Captain: टी-20 नंतर वनडेचं कॅप्टन पदही रोहित शर्माकडे, कोहलीला आणखी एक धक्का

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT