लढवय्या सचिन… कोरोनावर मात करुन मास्टर ब्लास्टर घरी परतला!
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आज (8 एप्रिल) तो रुग्णालयातून घरी परतला आहे. काही वेळापूर्वीच सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर पुढचे काही दिवस सचिन होम क्वॉरंटाइन असणार आहे. सचिनला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. सुरवातीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच सचिन काही दिवस होम क्वॉरंटाईन होता. […]
ADVERTISEMENT
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आज (8 एप्रिल) तो रुग्णालयातून घरी परतला आहे. काही वेळापूर्वीच सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर पुढचे काही दिवस सचिन होम क्वॉरंटाइन असणार आहे. सचिनला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती.
ADVERTISEMENT
सुरवातीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच सचिन काही दिवस होम क्वॉरंटाईन होता. दरम्यान, 2 एप्रिलला सचिनला कोरोनाचा त्रास अधिक जाणवू लागल्याने तो तात्काळ रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हापासून गेले सहा दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर कोरोनावर मात करुन आज सचिन आपल्या घरी परतला आहे.
याबाबत सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केलं आहे. पाहा सचिनने नेमकं काय म्हटलंय:
हे वाचलं का?
‘मी नुकताच दवाखान्यातून घरी आलो आहे. मी विश्रांती घेत असताना विलगीकरणात राहणारा राहणार आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचेच मी आभार मानू इच्छितो. खरोखरच प्रशंसनीय.’
‘ज्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी माझी चांगली काळजी घेतली आणि अशा कठीण परिस्थितीत वर्षभरापासून अथक परिश्रम घेत आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे.’
ADVERTISEMENT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 8, 2021
दरम्यान, सचिन जरी कोरोनाने संक्रमित झाला होता तरीही त्याचे कुटुंबीय मात्र कोरोनापासून सुरक्षित आहेत. सचिन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
ADVERTISEMENT
सचिन गेल्या काही दिवसापासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होता. अखेर आज तो घरी परतला असल्याने त्याच्या करोडो चाहत्यांना या बातमीमुळे हायसं वाटलं आहे.
कोरोनाची लागण झालेला सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये दाखल, फॅन्सना दिली महत्वाची माहिती
दरम्यान, सचिन तेंडुलकर हा काही दिवसांपूर्वीच रायपूरमध्ये आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. तो इंडिया लिजेंड्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सने चॅम्पियनशीपचा किताब देखील पटकावला होता. दरम्यान, या सीरीजमधील प्रत्येक सामन्याच्या आधी खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. सचिनने याचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
महाराष्ट्रात आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले, तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल एका दिवसात तब्बल 59 हजार 907 नवे रुग्ण सापडले होते. हा महाराष्ट्रातील आजवरचा सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा आहे. कारण एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण याआधी कधीच सापडले नव्हते. याशिवाय चिंताजनक बाब म्हणजे काल एक दिवसात 322 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसंच आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे सध्या राज्यात 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लग्नाचं काही खरं नाही…! ठाकरे सरकारच्या निर्णयाने लगीनघाईला ‘ब्रेक’
राज्य सरकारने 5 एप्रिपासून 30 एप्रिलपर्यंत राज्यात अत्यंत कठोर निर्बंध लागू केले आहे. हा प्रकारचा लॉकडाऊनच आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, असं असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने बरीच चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यात आज 30,296 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 26,13,627 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.36 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 322 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.79 टक्के एवढा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT