Ind vs Pak : दुबईत अवघ्या काही तासांत रंगणार महामुकाबला, काय आहेत दोन्ही संघांचा कच्चा दूवा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२४ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या टी-२० सामन्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष युएईतल्या दुबईकडे केंद्रीत होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की त्या निमीत्ताने होणाऱ्या घडामोडी, विजयाची समीकरणं, आकडेवारी या सर्व गोष्टी आपण प्रामुख्याने पाहतोच. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारताने एकदाही पाकिस्तानकडून पराभव स्विकारलेला नाही हा इतिहासही आपल्याला माहिती आहे.

ADVERTISEMENT

परंतू यंदाच्या स्पर्धेपुरता विचार करायला गेला तर प्रत्येक संघामध्ये एक-एक विक पॉईंट म्हणजेच कच्चा दुवा आहे. हा कच्चा दुवा त्या-त्या संघाला महागात पडू शकतो. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार असल्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष हे दुबईकडे असणार आहे. अशा परिस्थिती दोन्ही संघाचे असे कच्चे दुबे आहेत तरी काय की जे संघाला महाग पडू शकतात? याचा आढावा घेऊयात.

T20 World Cup : रोहित शर्माकडून भारताला आशा, परंतू पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ठरु शकते चिंतेचा विषय

हे वाचलं का?

१) भारताचा कच्चा दुवा –

भारताबद्दल सर्वात पहिल्यांदा बोलायचं झालं तर भारतासाठी विक पॉईंट ठरु शकतो तो म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याचं संघातलं स्थान हे अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे. परंतू दुर्दैवाने पाठीच्या ऑपरेशननंतर हार्दिकने एकदाही अशा पद्धतीने बॉलिंग केलेली नाही की ती पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. हार्दिक संघात असताना भारताला एका जास्तीच्या बॉलरची गरज लागायची नाही. परंतू हार्दिकचा फॉर्म खराब झाल्यानंतर आता भारताला एका जास्तीच्या बॉलरची गरज प्रकर्षाने जाणवायला लागली आहे.

ADVERTISEMENT

ही गोष्ट झाली बॉलिंगबद्दलची. परंतू बॅटींगमध्येही हार्दिकने फारकाही चांगलं काम गेल्या काही सामन्यांमध्ये केलेलं दिसंत नाही. आयपीएलमध्ये त्याला स्वतःचं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी होती. परंतू इथेही तो अपयशी ठरला. त्यामुळे हार्दिकचं फॉर्मात परतणं यावर भारताचं यशापयश मोठ्या-प्रमाणात अवलंबून असणार आहे.

ADVERTISEMENT

२) पाकिस्तानचा कच्चा दुवा –

पाकिस्तानच्या संघातला सर्वात मोठा आणि महत्वाचा विक पॉईंट सांगायला गेला तर तो असेल बेभरवशाची कामगिरी. कधीकधी पाकिस्तानी संघ अवघड वाटतील असे सामने लिलया जिंकून जातो. परंतू मोक्याच्या क्षणी हाराकिरी करत पाकिस्तानने अनेक सामने गमावले आहेत. २००९ सालानंतर पाकिस्तानने एकदाही टी-२० वर्ल्डकप जिंकला नाही. याचसोबत संघात फटकेबाजी करणाऱ्या फिनीशर्सची वानवा असणं हा देखील पाकिस्तानचा एक विक पॉईंट आहे.

बाबर आझम, मोहम्मद रिझवान यासारखे काही चांगले खेळाडू पाकिस्तानकडे आहेत. परंतू चांगली सुरुवात केल्यानंतरही अखेरपर्यंत टिकून राहत मोठा स्कोअर करणं त्यांना जमत नाही. शादाब खान, आझम खान यांच्यासारखे काही होतकरु आणि चांगले खेळाडू संघात आहेत जे मिडल ऑर्डर सांभाळू शकतात. परंतू त्यांनीही म्हणावी तशी कामगिरी अद्याप केलेली दिसत नाही. त्यामुळे हे मुद्दे पाकिस्तानला अगदी पहिल्याच सामन्यात धोकादायक ठरु शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT