World Test Championship: मॅच जिंकल्यानंतरही भारतावर संकट कायम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर १० विकेट्स राखून दणदणीत मात केली आहे. या विजयासह भारताने ४ मॅचच्या सिरीजमध्ये २-१ अशी आघाडी घेतली असून या सिरीजमधली शेवटची टेस्ट मॅच ही अहमदाबादच्या मैदानावरच खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर असली तरीही World Test Championship च्या फायनलमध्ये खेळण्यासाठी अजुनही टीम इंडियाला […]
ADVERTISEMENT
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर १० विकेट्स राखून दणदणीत मात केली आहे. या विजयासह भारताने ४ मॅचच्या सिरीजमध्ये २-१ अशी आघाडी घेतली असून या सिरीजमधली शेवटची टेस्ट मॅच ही अहमदाबादच्या मैदानावरच खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर असली तरीही World Test Championship च्या फायनलमध्ये खेळण्यासाठी अजुनही टीम इंडियाला वाट पहावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
अहमदाबादमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इंग्लंडचं World Test Championship मधलं आव्हान संपुष्टात आलंय. परंतू अंतिम फेरीत खेळायचं असेल तर टीम इंडियाला अखेरची टेस्ट मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं गरजेचं आहे. अखेरची टेस्ट मॅच जिंकल्यास भारताचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चीत होईल, पण इंग्लंड अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळेल.
World Test Championship Points Table Update:
If India win or draw the fourth Test against England, WTC final will be India v New Zealand
If England win the fourth Test against India, WTC final will be Australia v New Zealand#Cricket #INDvENG pic.twitter.com/PWDRkIQ1jk
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) February 25, 2021
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या इनिंगमध्ये अहमदाबादच्या पिचने स्पिनर्सना चांगली मदत केली. अहमदाबादच्या पिचवर रफ स्पॉटमध्ये पडल्यानंतर बॉल समोरच्या बॅट्समनला चांगलाच संभ्रमात पाडत होता. टीम इंडियालाही याचा फटका बसला. दुसऱ्या दिवशी जो रुट आणि जॅक लिच यांच्या माऱ्यासमोर ३ बाद ९९ वरुन भारताची अवस्था ऑलआऊट १४५ अशी झाली.
हे वाचलं का?
इंग्लंड्या संघाने केलेलं दमदार कमबॅक पाहता भारतीय संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये कडवी झुंज मिळेल अशी आशा होती. परंतू अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात इंग्लंडच्या बॅट्समनना अडकवत भारताची बाजू आणखीन वरचढ केली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत अक्षरने भारताला विजयासाठी ४९ रन्सचं सोपं टार्गेट मिळेल याची काळजी घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT