महाराष्ट्रातले ‘हे’ खेळाडू Tokyo Olympic मध्ये करणार भारताचं नेतृत्व
जपानच्या टोकियो शहरात होणारी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. २३ जुलैला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २०२० मध्ये या स्पर्धा होणं अपेक्षित होतं, परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. एरवी क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं टोकियो ऑलिम्पिकमधला सहभाग हा नाममात्र आहे. […]
ADVERTISEMENT
जपानच्या टोकियो शहरात होणारी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. २३ जुलैला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २०२० मध्ये या स्पर्धा होणं अपेक्षित होतं, परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
ADVERTISEMENT
एरवी क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं टोकियो ऑलिम्पिकमधला सहभाग हा नाममात्र आहे. १०० पेक्षा अधिक भारतीय खेळाडूच्या पथकात ८ खेळाडू महाराष्ट्राचे आहेत. आज कोणते महाराष्ट्राचे खेळाडू पदकांच्या शर्यतीत उतरणार आहेत हे जाणून घेऊयात.
Tokyo Olympic 2021 : जाणून घ्या भारताकडून आतापर्यंत कोणाला मिळालं टोकियोचं तिकीट?
हे वाचलं का?
१) राही सरनौबत – २५ मी. नेमबाजी (पिस्तुल)
२) तेजस्विनी सावंत – ५० मी. रायफल (३ पोजिशन)
ADVERTISEMENT
३) अविनाश साबळे – ३ हजार मी. स्टिपल चेस
ADVERTISEMENT
४) प्रवीण जाधव – तिरंदाजी
५) चिराग शेट्टी – बॅडमिंटन दुहेरी
६) विष्णू सर्वानन – सेलिंग लेजर स्टँडर्ड क्लास
७) स्वरुप उन्हाळकर – पॅराशुटींग, १० मी. रायफल
८) सुयश जाधव, पॅरास्विमींग, (५० मी. बटरफ्लाय. २०० मी. वैय्यक्तिक मिडले)
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर कसं असेल यंदाचं Tokyo Olympic? जाणून घ्या…
सहभागी झालेल्या ८ खेळाडूंपैकी २ खेळाडू हे पॅरालिम्पीक स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राच्या खेळाडूंचं कमी होत जाणारं स्थान हा चिंताजनक विषय बनला आहे. दरम्यान आठ खेळाडूंपैकी राही सरनौबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव हे पदकाचे दावेदार मानले जात आहेत.
Tokyo Olympic 2021 : Bajrang Puniya भारताला पदक मिळवून देण्यात यशस्वी होईल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT