Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात कांस्यपदक, Lovlina कडून विजेंदर, मेरी कोमच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होऊन कांस्यपदकाला गवसणी घालणाऱ्या लोवलिना बोर्गोहेनचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतंय. मुळची आसामची असलेल्या लोवलिनाकडून भारताला सुवर्णपदकाची आशा होती. परंतू उपांत्य फेरीत लोवलिनाला टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे लोवलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार असून तिने मेरी कोम आणि विजेंदर सिंगच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.

ADVERTISEMENT

२००८ साली झालेल्या बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत विजेंदर सिंगने तर २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने भारताला बॉक्सिंगमध्ये पदक मिळवून दिलं होतं. यानंतर तब्बल ९ वर्षांनी लोवलिनाने भारताला बॉक्सिंगमध्ये मेडल मिळवून दिलं आहे. ज्यासाठी तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

आसामाच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारो मुखिया नावाच्या गावात लोवलिना आणि तिचं कुटुंब राहतं. लोवलिनाच्या दोन बहिणी लिचा आणि लिमा या किक बॉक्सिंग प्रकारात खेळतात. हालाकीच्या परीस्थितीतही लोवलिनाच्या पालकांनी आपल्या दोन्ही मुलींना खेळण्यासाठी पूर्ण पाठींबा आणि सहकार्य दिलं. ऑलिम्पिकची तयारी करत असताना लोवलिनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

हे वाचलं का?

Tokyo Olympics 2020 : लोवलिना बोर्गोहेनचं Gold Medal चं स्वप्न भंगलं, भारताच्या खात्यात आणखी एक कांस्यपदक

मागच्या वर्षी लोवलिनाच्या आईवर किडनी ट्रान्सप्लान्टचं ऑपरेशन झालं. आपल्या आईला भेटण्यासाठी गेलेल्या लोवलिनाला त्यावेळेस कोरोनाचीही लागण झाली. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला युरोपसाठी रवाना होण्याआधीच लोवलिनासमोर हे संकट उभं राहिलं. त्यातच लॉकडाउनच्या काळात कँपमध्या बॉक्सिंगचा सराव तर थांबवण्यातच आला होता तसेच बॉक्सर्सना बाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती.

ADVERTISEMENT

परंतू यावेळी सरकारी मदतीच्या जोरावर लोवलिनाने कोरोनावर मात करुन स्पर्धेत सहभाग घेतलाच आणि ऑलिम्पिक पात्रता फेरीचा निकष पूर्ण करत तिने आपलं स्थानही निश्चीत केलं. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तिला कांस्यपदकाच्या रुपात मिळाल्याने आसामसह सर्व भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT