Tokyo Olympic 2020 : भारताचं आणखी एक पदक निश्चीत, बॉक्सर लोवलिना बोर्गोहेनची उपांत्य फेरीत धडक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने आणखी एक पदक निश्चीत केलं आहे. ६४-६९ वजनी गटात भारताची बॉक्सल लोवलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत लोवलिनाने चीन तैपेईच्या चेन निएनचा ४-१ ने पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी वेटलिफ्टींग प्रकारात मीराबाई चानूने भारताला पदकाची कमाई करुन दिली होती. परंतू यानंतर सलग ८ दिवस भारताच्या खात्यात […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने आणखी एक पदक निश्चीत केलं आहे. ६४-६९ वजनी गटात भारताची बॉक्सल लोवलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत लोवलिनाने चीन तैपेईच्या चेन निएनचा ४-१ ने पराभव केला.
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी वेटलिफ्टींग प्रकारात मीराबाई चानूने भारताला पदकाची कमाई करुन दिली होती. परंतू यानंतर सलग ८ दिवस भारताच्या खात्यात एकही पदक आलं नाही. अनेक महत्वाच्या खेळाडूंनी यादरम्यान निराशाजनक कामगिरी केली. परंतू लोवलिनाने आपल्याकडून असलेल्या अपेक्षांना साजेसा खेळ करत सामन्यावर वर्चस्व गाजवत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.
सामना जिंकल्यानंतर लोवलिनाने आपल्या खेळाबद्दल आनंद व्यक्त करत. सेमीफायनल जिंकून भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा आपला प्रयत्न असणार आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.
हे वाचलं का?
बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत हरलेल्या बॉक्सरलाही ब्राँझ पदकाचा मान मिळतो. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लोवलिनाने धडाकेबाज खेळ केला. पहिल्या राऊंडमध्ये पाचपैकी ३ पंचांनी लोवलिनाच्या बाजूने निकाल दिला. दुसऱ्या सेटमध्ये चीन तैपेईच्या खेळाडूने आक्रमक पंच लगावत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
पक्षपाती निर्णयाचा भारताला फटका? सामना संपून दोन तासांनी Mary Kom ला आपला पराभव झाल्याचं कळलं
ADVERTISEMENT
परंतू लोवलिनाने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत सुंदर बचाव आणि आक्रमण करत चीन तैपेईच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या राऊंडचा निकाल सर्वानुमते लोवलिनाच्या बाजूने लागल्यानंतर सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. सामन्यात उलटफेर करण्यासाठी चीन तैपेईच्या खेळाडूला मोठा उलटफेर करण्याची गरज होती. परंतू प्रत्यक्ष सामन्यात लोवलिनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला संधीच दिली नाही.
ADVERTISEMENT
अखेरच्या राऊंडमध्येही पंचांचा निर्णय ४-१ च्या फरकाने लोवलिनाच्या बाजूने गेला आणि भारताचं आणखी एक पदक निश्चीत झालं. उपांत्य फेरीत लोवलिनाने प्रवेश केला असला तरीही ब्राँझ पदकावर समाधान न मानता सुवर्णपदकासाठी लढण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT