Tokyo Olympic 2020 : मराठमोळ्या प्रवीण जाधवचा पदकावरचा नेम चुकला, आव्हान संपुष्टात
साताऱ्याचा मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवचं यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. पुरुषांच्या एकेरी प्रकारात आज प्रवीण जाधवला अमेरिकेच्या ब्रँडी एलिसनकडून पराभवाचा सामना करावा लागला. मोक्याच्या क्षणी कमी पडलेला आत्मविश्वास प्रवीण जाधवला चांगलाच महागात पडला. पहिल्या दिवशी भारताने पदकाची कमाई केल्यानंतर अजुनही पदकाची प्रतीक्षा कायम आहे. नेमबाजी, बॉक्सिंगमध्ये काही महत्वाचे खेळाडू अनपेक्षितरित्या बाहेर गेल्यामुळे […]
ADVERTISEMENT
साताऱ्याचा मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवचं यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. पुरुषांच्या एकेरी प्रकारात आज प्रवीण जाधवला अमेरिकेच्या ब्रँडी एलिसनकडून पराभवाचा सामना करावा लागला. मोक्याच्या क्षणी कमी पडलेला आत्मविश्वास प्रवीण जाधवला चांगलाच महागात पडला.
ADVERTISEMENT
पहिल्या दिवशी भारताने पदकाची कमाई केल्यानंतर अजुनही पदकाची प्रतीक्षा कायम आहे. नेमबाजी, बॉक्सिंगमध्ये काही महत्वाचे खेळाडू अनपेक्षितरित्या बाहेर गेल्यामुळे भारताला हक्काच्या खेळातून पदक मिळणार नाहीये. आजच्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी चांगली सुरुवात केली. तरुणदीप रॉय आणि प्रवीण जाधव यांनी आपला पहिल्या फेरीचा सामना जिंकला. प्रवीण जाधवने रशियाच्या गालसनवर ६-० अशी मात केली.
आगामी फेरीत प्रवीण जाधवसमोर अमेरिकेच्या ब्रँडी एलिसनचं आव्हान होतं. पहिल्या सेटमध्ये प्रवीणचं लक्ष्य विचलीत झाल्यामुळे ब्रँडीने आघाडी घेतली. परंतू यानंतरही प्रवीणने चांगलं कमबॅक करत आपल्या गुणांमधलं अंतर भरुन काढलं. तरीही पहिला सेट अमेरिकेच्या खेळाडूने २८-२७ च्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही हेच चित्र कायम राहिलं आणि अमेरिकेच्या खेळाडूने एका गुणाच्या आधारावर सेट जिंकला.
हे वाचलं का?
तिसऱ्या सेटमध्ये प्रवीणने ब्रँडी एलिसनला चांगली लढत दिली. परंतू तिसऱ्या संधीच्या अखेरीस प्रवीणचा आत्मविश्वास कमी पडला आणि त्याचा पदकावरचा नेम हुकला. २६-२३ च्या फरकाने तिसरा सेट जिंकत अमेरिकेच्या बँडीने बाजी मारत प्रवीण जाधवचं आव्हान संपुष्टात आणलं.
साताऱ्याच्या एका ग्रामीण भागातून आलेल्या प्रवीण जाधवने पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना सर्वांना प्रभावित केलं. मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी आणि एकेरी अशा प्रकारांमध्ये तो सहभागी झाला. यात दिपीका कुमारीसोबत मिश्र दुहेरी स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. पुरुष दुहेरीतही मोक्याच्या क्षणी त्याने केलेली एक चूक संघाला महाग ठरली. परंतू यातून सावरत त्याने एकेरी प्रकारात चांगलं पुनरागमन केलं. परंतू पदकाला गवसणी घालण्यात तो अपयशीच ठरला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT