Tokyo Olympics 2020 : कुस्तीपटू दीपक पुनिया सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर
एकीकडे रवी कुमार दहियाने कुस्तीत भारताला एक पदक निश्चीत केलं असताना दुसऱ्या ठिकाणी भारताला निराशेचा सामना करावा लागला आहे. ८६ किलो वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरने दीपकवर १०-० च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. रवी कुमारने अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्यामुळे दीपक पुनियाकडूनही भारताला पदकाची आशा […]
ADVERTISEMENT
एकीकडे रवी कुमार दहियाने कुस्तीत भारताला एक पदक निश्चीत केलं असताना दुसऱ्या ठिकाणी भारताला निराशेचा सामना करावा लागला आहे. ८६ किलो वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरने दीपकवर १०-० च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
ADVERTISEMENT
रवी कुमारने अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्यामुळे दीपक पुनियाकडूनही भारताला पदकाची आशा होती. परंतू प्रत्यक्ष सामन्यात डेव्हीड मॉरीस टेलरचा अनुभव हा कित्येक पटीने वरचढ जाणवत होता. टेलरने पुनियाला डोकं वर काढण्याची जराही संधी दिली नाही. २२ वर्षीय दीपकने आतापर्यंत झालेल्या सामन्यात आश्वासक खेळ केला असला तरही अनुभवी टेलरसमोर त्याचा निभाव लागला नाही. १०-० च्या फरकाने सामना जिंकत टेलरने अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपक कुमारला आता कांस्यपदकासाठी रेपिचाज राऊंडमध्ये वाट पहावी लागणार आहे.
Tokyo Olympics 2020 : कुस्तीत भारताचं पहिलं पदक निश्चीत, रवी कुमारची अंतिम फेरीत धडक
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT