Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे भारताने गमावलं एक पदक, पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताला तांत्रिक बिघाडामुळे एक पदक गमवावं लागलं आहे. 10 m Pistol प्रकारात भारताची युवा नेमबाज मनू भाकेरला पदकाच्या शर्यतीमधून बाहेर व्हावं लागलं. यासाठी कारण ठरलं ते म्हणजे पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड.

ADVERTISEMENT

मोक्याच्या क्षणी पिस्तूल खराब झाल्यानंतरही मनू भाकेरने दमदार पुनरागमन करत ६० शॉट्समध्ये ५७५ गुणांची कमाई केली. परंतू पदकांच्या शर्यतीतून ती बाहेर फेकली गेली. मनू भाकेरकडून भारताला पदकाची आशा होती, परंतू तांत्रिक बिघाडामुळे हे पदक भारताच्या हातातून निसटलं आहे. पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनू भाकेरची ६ मिनीटं वाया गेली, ज्याचा फटका तिला बसला.

जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

हे वाचलं का?

पात्रता फेरीला सुरुवात झाल्यानंतर मनू भाकेरने चांगली सुरुवात केली. पहिल्या १० शॉट्समध्ये मनूने आपल्या नावावर ९८ गुण जमा केले. १६ शॉट्सनंतर मनूचा स्कोअर १५६ असा होता. परंतू यानंतर मनूला आपल्या पिस्तुलात काहीतरी बिघाड झाल्याचं लक्षात आलं. मनूने ही बाब आपले कोच रौनक पंडीत यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर तिने तात्काळ ही बाब ज्युरी मेंबर्सना सांगितली. मनूच्या पिस्तुलातील लिव्हरचा पार्ट तुटला होता. ज्यामुळे बॅरल बाहेर येत नसल्यामुळे तिला पॅलेट्स लोड करता येत नव्हत्या.

ज्युरी मेंबर्सशी झालेल्या चर्चेनंतर मनूला पिस्तुल बदलण्याची परवानगी देण्यात आली. मनूने तात्काळ आपली पिस्तुल बदलली, परंतू दरम्यानच्या काळात तिची ६ मिनीटं वाया गेली, ज्याचा परिणाम तिच्या कामगिरीवर झाला.

ADVERTISEMENT

Tokyo Olympic : मीराबाईच्या खांद्यांना बळ देणारे मराठी हात, भारताच्या रौप्यपदकामागचं बदलापूर कनेक्शन

ADVERTISEMENT

परंतू यानंतरही तिने हार न मानता नंतरच्या ४ शॉट्समध्ये परफेक्स १० स्कोअर करत आपलं आव्हान कायम राखलं. परंतू या गोंधळामुळे लक्ष विचलीत झालेल्या मनुला मोक्याच्या क्षणी आवश्यक गुणांची कमाई करता आली नाही. ज्यामुळे पात्रता फेरीत ती १२ व्या स्थानावर फेकली गेली आणि भारताला मोठा धक्का बसला. याच प्रकारात भारताची आणखी एक नेमबाज यशस्विनी देसवाल तेराव्या स्थानावर आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT