Tokyo Paralympics : उंच उडीत भारताच्या प्रवीण कुमारला रौप्यपदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात T44 गटात भारताच्या प्रवीण कुमारने रौप्य पदकाची कमाई केली आहे.

ADVERTISEMENT

पावसाने हजेरी लावलेल्या अंतिम फेरीत १८ वर्षीय प्रवीण कुमारने एकाग्रचित्ताने खेळ करत पदकाची कमाई केली. या कामगिरीसह प्रवीण कुमार पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात प्रवीण कुमारने १.८८ मी. उंच उडीचा निकष पूर्ण केला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १.९३ मी. चा निकष असताना प्रवीणने १.९७ मी. उंच उडी मारत पदकांच्या शर्यतीत आपली दावेदारी पक्की केली.

यानंतर तिसऱ्या प्रयत्नात २.०१ मी. ची उडी घेत प्रवीणने आपलं पदक निश्चीत केलं. या फेरीत ब्रिटनच्या खेळाडूला गोल्ड तर पोलंडच्या खेळाडूला कांस्यपदक मिळालं. चौथ्या प्रयत्नात प्रवीण कुमारला २.०४ मी. ची उडी घेण्यात यश आलं. मात्र यानंतरच्या प्रयत्नात २.०७ मी. उडी घेण्यात तो अपयशी ठरला. परंतू नंतरच्या प्रयत्नात प्रवीणने हे अंतर पार करत आशियाई विक्रमाची नोंद केली. इंग्लंडच्या खेळाडूने २.१० मी. चं अंतर पार केल्यानंतर प्रवीण कुमारचं सिल्वर मेडल पक्कं झालं.

हे वाचलं का?

उंच उडी प्रकारातलं भारताचं हे चौथं पदक ठरलं. त्याआधी भारताच्या निषाद कुमार, मरीयप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांनी उंड उडीत पदक मिळवलं. जन्म झाल्यापासून प्रवीणच्या एका पायाची उंची कमी होतं. शाळेत असताना प्रवीणने आपल्या मित्रांच्या सहाय्याने खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने व्हॉलिबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. परंतू यानंतर त्याने Athletics प्रकारात आपलं लक्ष वळवलं. २०२१ मध्ये दुबईत झालेल्या पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेतही प्रवीणने उंच उडीत रौप्य पदकाची कमाई केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT