Tokyo Paralympics: भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, 10 मी. शूटिंग स्पर्धेत Gold Medal

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो: टोकियो पॅरालॉम्पिक 2020 स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. आज (30 ऑगस्ट) भारताच्या अवनी लेखरा हिने 10 मी. एअर रायफल शूटींग स्पर्धेत थेट सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पात्रता फेरीत सातव्या स्थानी असलेल्या अवनीने जबरदस्त कामगिरी करत थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

ADVERTISEMENT

अंतिम फेरीत अवनीने सर्वाधिक 249.6 गुणांची कमाई करुन सुवर्ण पदक पटकावलं. पॅरलॉम्पिक्सच्या इतिहासात शूटिंगमध्ये भारताचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे.

अवनीने फायनलमध्ये 249.6 गुणांची कमाई करुन वर्ल्ड रेकॉर्डची देखील बरोबरी केली आहे. यावेळी चीनच्या झांग कुयपिंगल 248.9 गुणांवर समाधान मानावं लागलं. तर युक्रेनच्या इरियाना शेतनिक हिने 227.5 गुणांसह कांस्यपदक पटकावलं.

हे वाचलं का?

पात्रता फेरीत अवनी होती सातव्या स्थानी

अवनीने 10 मी. एअर रायफल शूटींग स्पर्धेत क्लास एसएच 1 च्या फायनलमध्ये स्थान मिळवत आपली आव्हान कायम ठेवलं होतं. क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये 21 स्पर्धकांपैकी फक्त 8 जणांनाच संधी मिळते. अशावेळी अवनीने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर सातवं स्थान पटकावत अंतिम राऊंडमध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान, यावेळी तिने 60 सीरीजच्या सहा शॉटनंतर 621.7 चा स्कोअर केला होता.

ADVERTISEMENT

पात्रता फेरीत चीनची झांग कुयपिंग आणि युक्रेनची इरियाना शेतनिक यांनी 626.0 गुणांची कमाई करत क्वॉलिफेकशन राऊंडमध्ये दोघी टॉप 2 होत्या. पण फायनल राऊंडमध्ये या दोघींवर मात करत अवनीने सुवर्ण पदक पटकावलं.

ADVERTISEMENT

Tokyo Paralympics : निषाद कुमारला उंच उडीत रौप्यपदक, भारताची धडाकेबाज सुरुवात

अवनीने रचला इतिहास…

पॅरालॉम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी अवनी ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. भारताचं शूटिंगमधील देखील हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. पॅरालॉम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे.

रविवारी महिला टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेल आणि उंच उडी स्पर्धेत अॅथलिट निषाद कुमारने रौप्य पदक पटकावलं. भारतीय पॅरालॉम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी रिओ पॅरालॉम्पिक 2016 स्पर्धेत गोळा फेक प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं. या खेळामध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

अवनीच्या आधी भारताकडून पॅरालॉम्पिक खेळांमध्ये मुरलीकांत पेटकर (जलतरणपटू, 1972), देवेंद्र झाझरिया (पुरुष भाला फेक, 2004 आणि 2016) आणि मरियप्पन थंगावेलु (उंच उंडी 2016) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली होती. ज्यामध्ये आता अवनी लखेराची देखील नोंद झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT