Tokyo Paralympics : भारताच्या खात्यात दोन आकडी पदकं, उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलूला रौप्यपदक
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. उंच उडी प्रकारात भारताच्या मरीयप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत भारताची पदकसंख्या १० वर नेऊन ठेवली आहे. उंच उडीच्या T63 प्रकारात अमेरिकेच्या सॅम ग्रेवने सुवर्णपदकाची कमाई केली. २०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मरीयप्पनकडून सर्वांना यंदा अपेक्षा […]
ADVERTISEMENT
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. उंच उडी प्रकारात भारताच्या मरीयप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत भारताची पदकसंख्या १० वर नेऊन ठेवली आहे.
ADVERTISEMENT
उंच उडीच्या T63 प्रकारात अमेरिकेच्या सॅम ग्रेवने सुवर्णपदकाची कमाई केली. २०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मरीयप्पनकडून सर्वांना यंदा अपेक्षा होती. परंतू १.८८ मी. उंच उडीच्या जोरावर अमेरिकेच्या सॅमने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मरीयप्पन आणि सॅम यांच्यात अंतिम फेरीत चांगलीच चुरस रंगली होती परंतू अखेरीस अमेरिकेच्या सॅमने बाजी मारली.
Tokyo Paralympics : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, नेमबाजीत सिंघराजला कांस्यपदक
हे वाचलं का?
२०१६ साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या भारताच्या वरुण भाटीचं आव्हान मात्र यंदा अंतिम फेरीत सातव्या स्थानावरच संपुष्टात आलं. मरियप्पनला अंतिम फेरीत १.८८ मी. चं अंतर पार करण्याची तीनवेळा संधी आली होती, परंतू यामध्ये तो अपयशी ठरला. अमेरिकेच्या सॅमने मात्र तिसऱ्या संधीचं सोनं करत मरियपन्नचं सुवर्णपदकाचं स्वप्न मोडीत काढलं. यानंतर सॅमने मागे वळून पाहिलंच नाही आणि नंतरच्या प्रत्येक संधीच सर्वोत्तम कामगिरी करत आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT