Vinesh Phogat: ''विनेश फोगट निवृत्ती मागे घेणार'', 'त्या' भावूक करणाऱ्या पत्रात काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 vinesh phogat emotional post future hints at 2032 goal paris olympic 2024
विनेशने तिच्या वडिलांच्या आशा आणि आईच्या संघर्षाची आठवण केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुस्तीपटू विनेश फोगटने एक भावनिक पोस्ट लिहली आहे

point

विनेशने तिच्या पत्रात आपली व्यथा आणि संघर्ष सांगितला

point

विनेशने तिच्या वडिलांच्या आशा आणि आईच्या संघर्षाची आठवण केली.

Vinesh phogat emotional post : ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला खेळाडू ठरलेल्या विनेश फोगटचे रौप्य पदकाचंही स्वप्न भंगलं होतं. क्रीडा लवादाने तिच्या याचिका फेटाळल्यानंतर तिच्या हातून रौप्य पदकही निसटलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता ती मायदेशी परतली होती. आता तिने देशवासियांना भावूक करणारी पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने आपली व्यथा आणि संघर्ष सांगितला आहे. (vinesh phogat emotional post future hints at 2032 goal paris olympic 2024)

ADVERTISEMENT

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने एक भावनिक पोस्ट जारी केली आहे.तिच्या पोस्टमध्ये विनेशने तिची सुरुवातीची स्वप्ने, तिच्या वडिलांच्या आशा आणि आईच्या संघर्षाची आठवण केली. तिने पती सोमवीरला प्रत्येक चढ-उतारात साथ दिल्याचे श्रेय दिले आहे.

हे ही वाचा : Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे

विनेश फोगाटच्या पत्रात काय? 

विनेश फोगाटनं लहान खेड्यातील मुलगी असल्यानं ऑलिम्पिक काय असतं हे माहिती नव्हतं. लहान मुलगी असताना लांब केस असावेत असं स्वप्न असतं. मोठं झाल्यानंतर प्रत्येक तरुणीचं हातात मोबाईल असणं याशिवाय इतर गोष्टी करणं असं स्वप्न असतं. माझे वडील बस चालक होते, ते म्हणायचे, माझ्या मुलीनं विमानातून प्रवास करावा त्यावेळी मी रस्त्यावर गाडी चालवत असावं. माझ्या वडिलांचं स्वप्न मी सत्यात उतरवलं. सर्वात लहान असल्यानं वडिलांची लाडकी होते, असं विनेशनं म्हटलं. 

हे वाचलं का?

आईनं तिच्या मुलींनी तिनं जे आयुष्य जगलं त्याच्या पेक्षा चांगलं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष केला, असंही विनेश म्हणाली. वडिलांच्या निधनानंतर तीन महिन्यातच आईला कॅन्सर झाल्याचा उल्लेख विनेशनं केला आहे.आईनं केलेला संघर्ष, कधीच हार मानायची नाही ही वृत्ती, लढाऊ बाणा यामुळं मी घडले, असं ती म्हणाली. जे तुझं असेल त्यासाठी संघर्ष करं हे आईनं शिकवलं. जेव्हा धाडस करायचं असतं तेव्हा आईच्या धाडसीपणाचा विचार करते, असं विनेश फोगाटनं म्हटलं. 

विनेश फोगटने तिच्या पोस्टच्या शेवटी लिहले की, 'कदाचित वेगवेगळ्या परिस्थितीत मी 2032 पर्यंत स्वत:ला खेळताना पाहू शकेन, कारण माझ्यामध्ये लढाई आणि कुस्ती नेहमीच असेल. भविष्यात माझ्यासाठी काय आहे आणि या प्रवासात पुढे काय आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की मी ज्यावर विश्वास ठेवतो आणि जे योग्य आहे त्यासाठी मी नेहमीच लढत राहीन, असे तिने म्हटले आहे. विनेश फोगटच्या या पत्रावरून ती निवृत्ती मागे घेईल अशी चर्चा सुरु झाली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Amol Mitkari : ''शेलारांनी पाठ सोलून काढा ही भाषा...'', अजित पवारांचा आमदार 'हे' काय बोलून गेला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT