Tokyo Olympics : अंतिम फेरीआधी पाकिस्तानचा अर्शद माझा भाला घेऊन फिरत होता – Neeraj Chopra चा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकच्या अखेकरच्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करत कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करायची संधी दिली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वच स्तरातून नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. ८७.५८ मी. लांब भाला फेकत नीरजने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. परंतू अंतिम फेरीवेळी एका गोष्टीमुळे नीरजला उशीर झाला, ज्यावरुन सोशल मीडियावर सध्या चांगलाच वाद सुरु आहे.

ADVERTISEMENT

अंतिम फेरीत नीरज चोप्राचा भाला फेकण्यासाठीचा दुसरा नंबर होता. परंतू ज्यावेळी नीरज चोप्राची भाला फेकण्याची वेळ आली त्यावेळी त्याला आपला भाला सापडत नव्हता. अखेरीस नीरजला आपला भाला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या हातात सापडला.

फायनच्या वेळी मी माझा भाला शोधत होतो, पण मला तो सापडत नव्हता. अचानक मी अर्शदला माझा भाला घेऊन जाताना पाहिलं. त्यावेळी मी लगेच त्याला थांबवून म्हणालो, भावा भाला दे मला , तो माझा भाला आहे. यानंतर त्याने मला भाला दिला आणि मी घाई-घाईत माझा पहिला प्रयत्न पूर्ण केला.

नीरज चोप्रा – टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता

हे वाचलं का?

भालाफेकीत प्रत्येक खेळाडूला आपली संधी पूर्ण करण्यासाठी एक ठराविक वेळ मिळते. पाकिस्तानी खेळाडूच्या या वागणुकीमुळे नीरज चोप्राचं फायनलवेळी लक्ष विचलीत होऊ शकलं असतं. परंतू सुदैवाने असं काही झालं नाही आणि नीरजने सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.

Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT