महिला प्रीमियर लीग लिलाव ऑनलाइन आणि टीव्हीवर केव्हा आणि कुठे पहाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Women Primer League Auction : 409 खेळाडूंसह,महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चा लिलाव (Women Primer League 2023) सोमवार, 13 फेब्रुवारी रोजी (Mumbai) मुंबईत होणार आहे. यापूर्वी, बीसीसीआयने (BCCI) उघड केले होते की, त्यांना 1525 खेळाडूंच्या नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 246 भारतीय (Indian Players) आणि 163 परदेशी खेळाडू अशे एकूण 409 खाळाडूंचा लिलावात (409 Players In Auction) समावेश केला जाणार आहे. 24 खेळाडूंनी ₹50 लाखांच्या सर्वोच्च बेसप्राईजवर लिस्टेड करण्यात आले आहे आणि त्यात 14 परदेशी आणि 10 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. When and where to watch the Women’s Premier League auction

ADVERTISEMENT

WPL 2023 Auction: महिला क्रिकेटचा नवीन अध्याय; WPL साठी आज लिलाव

सर्वोच्च बेस प्राईजच्या यादीत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, अ‍ॅलिसा हिली, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टोन आणि डिआंड्रा डॉटिन यांचा समावेश आहे. तसेच, भारतीय अंडर-19 T20 विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्यांचीही लिलावासाठी नोंदणी करण्यात आली आहे. तसेच, पाच फ्रँचायझींकडे ₹12 कोटी रुपये असतील.

हे वाचलं का?

WPL लिलाव कुठे होत आहे?

WPL 2023 लिलाव मुंबईतील JIO कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

WPL 2023 लिलाव कधी होईल?

WPL 2023 लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) होणार आहे

ADVERTISEMENT

WPL 2023 लिलाव किती वाजता सुरू होईल?

WPL 2023 लिलाव IST दुपारी 2:30 पासून सुरू होईल. प्री-शो आधी दुपारी 1 च्या सुमारास सुरू होईल

ADVERTISEMENT

भारतात कोणते दूरचित्रवाणी चॅनेल WPL 2023 लिलाव थेट प्रक्षेपित करतील?

भारतात, WPL 2023 लिलाव दूरदर्शनवर Sports18 द्वारे थेट प्रसारित केला जाईल.

भारतात WPL 2023 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?

WPL 2023 लिलाव भारतात Jio Cinema द्वारे लाईव्ह दाखवले जाईल.

लिलावाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

• महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण ५ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाकडे 12-12 कोटी रुपयांची पर्स असेल.

• WPL लिलावाच्या यादीत एकूण 409 खेळाडू आहेत, ज्यात 202 कॅप्ड खेळाडू, 199 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 246 भारतीय, 163 विदेशी खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया (28) आणि इंग्लंडचे (27) खेळाडू सर्वाधिक आहेत.

• प्रत्येक संघ त्यांच्या संघात 15 ते 18 खेळाडूंचा समावेश करू शकतो. 24 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 50 लाख आहे, 30 खेळाडूंची 40 लाख तर काहींची 30 लाख आहे. अनकॅप्ड खेळाडूंची मूळ किंमत 10 ते 20 लाख आहे.

भारतीय U19 महिला संघाच्या कॅप्टनची इतकी चर्चा का होतीय?

• भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारखी मोठी नावे लिलावात लक्ष केंद्रित करणार आहेत.

• जर आपण परदेशी खेळाडूंबद्दल बोललो तर, सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा पेरी, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग, न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईन, इंग्लंडच्या सोफी एलिस्टन यांसारख्या खेळाडूंवर आहेत.

महिला प्रीमियर लीगचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता होणार आहे. हे मुंबईत आयोजित केले जात आहे, ते स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमा अॅपवर प्रसारित केले जाईल. महिला प्रीमियर लीग लिलावाशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्ही mumbaitak.in वर जाणून घेऊ शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT