WTC Final : पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया, Reserve Day ची तरतूद लागू होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. सकाळपासून साऊदम्प्टनमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. यानंतर पावसाने उसंत घेतली परंतू खेळपट्टी आणि मैदान पूर्ववत करणं अशक्य असल्यामुळे अंपायरनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला.

ADVERTISEMENT

WTC Final : Nuteral Venue वर भारत विरुद्ध न्यूझीलंड लढतीचा इतिहास काय सांगतो?

दरम्यान आयसीसीने अंतिम सामन्याच्या प्लेइंग कंडीशन आणि नियमांची घोषणा करताना पावसामुळे दिवसाचा खेळ वाया गेल्यास एक दिवस राखून ठेवला आहे. दरम्यान साऊदम्प्टनमध्ये पुढील ४-५ दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ सहाव्या दिवसावर येऊन ठेपणार आहे. अशा परिस्थितीत Reserve Day लागू होण्यासाठी काय नियम आहेत हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये पाच दिवसांचा खेळ व्हावा यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर एखादा दिवस वाया जाऊन त्यादिवशी खेळ होऊ शकला नाही आणि उर्वरित दिवसांमध्ये वाया गेलेल्या दिवसाची नुकसानभरपाई झाली नाही तरच हा सामना रिझर्व्ह डे मध्ये खेळवला जाईल. परंतू उर्वरित पाच दिवसांमध्येही जर सामन्याचा निकाल लागला नाही तर कोणताही अतिरीक्त राखीव दिवस मिळणार नाही आणि सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात येईल.

Ind vs NZ : ऋषभ पंत ठरणार भारतासाठी प्लस पॉईंट, जाणून घ्या WTC मधली त्याची आतापर्यंतची कामगिरी

ADVERTISEMENT

सामना रिझर्व्ह डे मध्ये खेळवायचा की नाही याचा निर्णय सामनाधिकारी घेणार असून ते प्रत्येक दिवसाच्या अखेरीस किती तास वाया गेले याचा अंदाज घेतली. रिझर्व्ह डे बद्दलचा निर्णय हा पाचव्या दिवशी घेतला जाणार आहे. जर यानंतरही सामना अनिर्णित राहिला तर भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात येईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT