WTC Final : जाणून घ्या भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत भारताला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने ८ गडी राखून भारतावर मात केली आणि पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपवर आपलं नाव कोरलं. पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. परंतू राखीव दिवसाच्या खेळात न्यूझीलंडच्या संघाने सामन्याचं पारडं […]
ADVERTISEMENT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत भारताला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने ८ गडी राखून भारतावर मात केली आणि पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपवर आपलं नाव कोरलं. पहिल्या ५ दिवसांपैकी २ दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता.
ADVERTISEMENT
परंतू राखीव दिवसाच्या खेळात न्यूझीलंडच्या संघाने सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवलं. टीम इंडियाकडून नेमक्या अशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला?
WTC Final : पहिला मान न्यूझीलंडचा, Team India वर मात करत जिंकली टेस्ट चॅम्पिअनशीप
हे वाचलं का?
१) चेतेश्वर पुजाराचं फॉर्मात नसणं –
चेतेश्वर पुजारा हा टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरचा भारताचा हक्काचा बॅट्समन ओळखला जातो. परंतू त्याचा संथ खेळ हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरतो. पहिल्या इनिंगमध्ये पुजाराने ५४ बॉल खेळून ८ रन्स काढल्या. या ८ रन्स त्याने दोन चौकार लागवत काढल्या. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये पुजाराने एकही रन धावून काढली नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये विशेषकरुन बाहेरील देशांमध्ये खेळताना पिच आणि बॉलचा अंदाज घेण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो ही बाब मान्य…पण बॉल खर्च करुन जर रन्स होणार नसतील तुमच्या समोरच्या बॅट्समनचा रिदम बिघडला जातो.
ADVERTISEMENT
दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराचा हा संथ खेळ कायम राहिला. सहाव्या दिवशी जिकडे भारताला खेळपट्टीवर फलंदाजांनी स्थिर राहून खेळणं गरजेचं होतं. तिकडे पुजाराने आपली विकेट अक्षरशः फेकली. तसेच न्यूझीलंड जेव्हा १३९ रन्सचा पाठलाग करत होतं, त्यावेळी रॉस टेलरचा सोपा कॅच पुजाराने सोडला. हा कॅच पुजाराने पकडला असता तर मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडवर दबाव टाकण्यात भारताला यश आलं असतं.
ADVERTISEMENT
२) न्यूझीलंडच्या शेपटाची वळवळ थांबवण्यात भारतीय बॉलर्स कमी –
पहिल्या डावात न्यूझीलंडने भारतावर ३२ रन्सची आघाडी घेतली. मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने न्यूझीलंडची पहिल्या इनिंगमध्ये ६ बाद १६२ अशी अवस्था केली होती. खरं पहायला जाता न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांना झटपट गुंडाळणं भारतीय बॉलर्ससाठी फार मोठी गोष्ट नव्हती. परंतू हीच गोष्ट त्यांना जमली नाही. न्यूझीलंडच्या टेलएंडर्सनी यानंतर ८७ रन्स जोडत आपल्या संघाला महत्वाची आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी न्यूझीलंडला दुसऱ्या इनिंगमध्ये कामाला आली.
पाचव्या दिवसाअखेरीस भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात न्यूझीलंडला यश आलं. ज्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींगदरम्यान भारताचे बॅट्समन हे दडपणाखाली चूका करत गेले आणि न्यूझीलंडने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
BLOG : प्रश्न इतकाच की BCCI ती हिंमत दाखवणार का?
३) रविंद्र जाडेजाचा संघातली भूमिका काय?
इंग्लंडमधील हवामानात जिथे फास्ट बॉलर्सची चलती असते तिकडे दोन स्पिनरना संघात स्थान द्यायचं की नाही यावरुन बरेच प्रश्न विचारले जात होते. परंतू तरीही विराट कोहलीने आश्विन आणि जाडेजाला संघात स्थान दिलं. जाडेजाला संघात स्थान देताना अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार करण्यात आला. परंतू ज्यासाठी त्याला संघात घेतलं ते काम त्याच्याकडून करवून घेण्यात आलं का?
तर याचं उत्तर नाही असंच मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये ७ तर दुसऱ्या इनिंगमध्ये ८ ओव्हर्स जाडेजाने टाकला. मग जाडेजाला इतकी कमी संधी द्यायची होती तर इंग्लंडच्या हवामानात टीम इंडियाला हनुमा विहारी किंवा अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरला संघात स्थान देता आलं असतं. साऊदम्प्टनमध्ये जिथे बॉल हवेत वळतो तिकडे शार्दुल संघासाठी उपयुक्त ठरु शकला असता.
४) टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र सपशेल फेल –
टीम इंडियाचा हुकुमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह या मॅचमध्ये एकही विकेट काढू शकला नाही. यंदाचं वर्ष हे बुमराहसाठी निराशाजनक ठरतंय. आतापर्यंत झालेल्या ४ मॅचमधील ६ इनिंगमध्ये त्याने फक्त ७ विकेट घेतल्या आहेत. बुमराह फॉर्मात नसल्यामुळे इतर दोन बॉलर्सवर चांगलाच तणाव आलेला पहायला मिळाला. दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहच्या बॉलवर रॉस टेलरचा एक कॅच पकडण्याची संधी पुजाराकडे आली होती पण तो कॅच सोडून पुजााने आणखीच चित्र सोपं केलं.
WTC Final : विराटने संधी दवडली, सोशल मीडियावर फॅन्स नाराज; म्हणाले आता तरी रोहितला कॅप्टन करा !
५) सहाव्या दिवशी भारतीय बॅट्समनची हाराकिरी –
पाचव्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्यानंतर भारतीय बॅट्समनला अखेरच्या दिवशी सावध खेळ करणं गरजेचं होतं. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांसारखे दिग्गज फलंदाज अखेरच्या दिवशी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवतील असा अंदाज होता. परंतू न्यूझीलंडने भारताचे हे सर्व मनसुबे फोल ठरवले. मधल्या फळीत ऋषभ पंतनेही थोडावेळ न्यूझीलंडला चांगली झुंज दिली. पण दिवसाचा खेळ संपायला ६० ओव्हर्स शिल्लक असतानाही ऋषभने बेजबाबदार फटका खेळत आपली विकेट फेकली, ज्यामुळे न्यूझीलंडला सोपं आव्हान मिळालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT