WTC Final : टीम इंडियाकडून Playing XI ची घोषणा, इशांत-बुमराह-शमीला संघात स्थान
१८ जूनला (शुक्रवारी) साऊदम्पटनच्या मैदानावर रंगणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाचं भारतासमोर आव्हान असणार आहे. यासाठी भारताने अनुभवी खेळाडूंवर पुन्हा एकदा भरवसा टाकण्याचं ठरवलं आहे. जलदगती गोलंदाजीचा भक्कम अनुभव असलेले इशांत शर्मा-मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संधात स्थान मिळालं असून […]
ADVERTISEMENT
१८ जूनला (शुक्रवारी) साऊदम्पटनच्या मैदानावर रंगणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाचं भारतासमोर आव्हान असणार आहे. यासाठी भारताने अनुभवी खेळाडूंवर पुन्हा एकदा भरवसा टाकण्याचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
जलदगती गोलंदाजीचा भक्कम अनुभव असलेले इशांत शर्मा-मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संधात स्थान मिळालं असून अष्टपैलू रविंद्र जाडेजानेही संघात स्थान मिळवलं आहे.
? NEWS ?
Here's #TeamIndia's Playing XI for the #WTC21 Final ? ? pic.twitter.com/DiOBAzf88h
— BCCI (@BCCI) June 17, 2021
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
हे वाचलं का?
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), ऋषभ पंत (विकेट किपर), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT