संघातलं Star Culture बदलण्याची गरज, माजी प्रशिक्षक रमण यांचं सौरव गांगुलीला पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि NCA (National Cricket Academy) चा प्रमुख राहुल द्रविडला पत्र लिहून संघातील Star Culture बद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघात सध्याच्या घडीला सर्वकाही आलबेल नसल्याचच चित्र दिसतंय.

ADVERTISEMENT

मराठमोळा रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

भारतीय संघात Prime Dona (ओपेरा गायन प्रकारात मुख्य गायिकेला Prima dona म्हणतात) कल्चर दिसून येतं आणि हे बदलण्याची गरज आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार रमण यांनी प्रशिक्षकपदावर दुसऱ्यांदा संधी न मिळूनही भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्याचा विचार करुन एक रोडमॅप तयार करुन देण्याची तयारी दाखवली आहे.

हे वाचलं का?

मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने रमण यांना प्रशिक्षकपदासाठी दुसऱ्यांना संधी न देता रमेश पोवारच्या नावाची शिफारस केली. २०१८ साली रमेश पोवारची पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर रमण यांना प्रशिक्षकपदावर संधी मिळाली होती. रमण यांच्या पत्रात कोणाचंही नाव लिहीलेली नसलं तरीही संघातलं हे स्टार कल्चर संपूर्ण संघासाठी हानिकारक ठरत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केल्याचं कळतंय.

रमण यांनी आपल्या पत्रात सौरव गांगुलीलाही या विषायवर आपलं मत एक माजी कर्णधार म्हणून व्यक्त करण्याची विनंती केली आहे. जर अध्यक्ष आणि सचिव यांना माझ्या कामाबद्दल काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर द्यायलाही मी तयार असल्याचं रमण यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ADVERTISEMENT

रमेश पोवार आणि मिताली राज यांनी आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं – दीप दासगुप्ता

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT