India vs Australia :
इंदौर : भारत-ऑस्ट्रेलियामधील (India vs Australia) बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar trophy) ट्रॉफीतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी या मालिकेतील दोन्हीही सामने मोठ्या फरकाने जिंकत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन मालिका जिंकण्यासाठी आणि सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय जर हा सामना भारताने जिंकला तर आणखी दोन मोठ्या गोष्टी भारताच्या हाती लागणार आहेत. (Australia is eager for a comeback. Team India wants to win the series and secure their ticket to the finals of the World Test Championship)
इंदौरचा सामना जिंकला तर काय?
इंदौरचा कसोटी सामना जिंकल्यास, टीम इंडिया मालिका तर जिंकेलच. पण याशिवाय चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खिशात घालणार आहे. शिवाय अधिकृतपणे कसोटी क्रमवारीत नंबर-१ बनू शकणार आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीतही भारताचं स्थान पक्क होणार आहे.
Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला
सध्याच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर-१ आणि भारत नंबर-२ वर आहे, ऑस्ट्रेलियाचे १२६ रेटिंग पॉईंट आहेत आणि भारताचे ११५ रेटिंग पॉईंट आहेत. मात्र, टीम इंडिया मालिकेत २-० ने आघाडीवर असून इंदौर कसोटी जिंकल्यास रेटिंग अपडेट केले जाईल. टीम इंडियाने इंदौर कसोटी जिंकल्यास १२१ रेटिंग पॉईंट होतील तर ऑस्ट्रेलियाचे ११९ गुण होतील. म्हणजेच टीम इंडिया नंबर-१ वर असेल, असे झाले तर इतिहास रचला जाईल. कारण टीम इंडिया टी-20 आणि एकदिवसीय रँकिंगमध्ये आधीच नंबर-१ आहे आणि आता टेस्टमध्येही नंबर-१ होईल.
याशिवाय टीम इंडिया अधिकृतपणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार. फक्त टॉप-2 संघच टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकतात, टीम इंडिया सध्या नंबर-2 वर आहे आणि तीही पोहोचू शकते. पण इंदूर कसोटीतील विजयाने हे स्थान भक्कम होईल. म्हणजेच जूनमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ही लढत होण्याची शक्यता जास्त आहे.
Ind vs Aus test: कांगारू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात, ऑस्ट्रेलियाची दाणादाण
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 –
पहिली कसोटी – भारत एक डाव आणि 132 धावांनी विजयी
दुसरी कसोटी – भारत 6 विकेट्सने विजयी
तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, इंदूर
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद