Photo Credit; instagram

2 लग्न मोडली, 19 वर्षी झाली आई, करीअर बर्बाद झाल्यावरही कसं केलं कम बॅक?

Photo Credit; instagram

अभिनेत्री रुखसार रहमानचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. या अभिनेत्रीनं पीके सारख्या बॉलिवूड चित्रपटांसोबत बऱ्याच डेली सोपमध्ये सुद्धा काम केलं आहे.

Photo Credit; instagram

तिला वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे. मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत कम करुनसुद्धा तिला पालकांच्या दबावाखाली अभिनय क्षेत्र सोडावं लागलं.

Photo Credit; instagram

'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या मुलाखतीत वयाच्या 17 व्या वर्षी रुखसारने 'याद रखेगी दुनिया' या चित्रपटातून डेब्यू केलं. तिने सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूरसोबत सुद्धा एका चित्रपटात काम केलं आहे.

Photo Credit; instagram

मात्र, पालकांच्या हट्टामुळे तिला सिनेसृष्टी सोडावी लागली आणि लग्न करावं लागलं. फक्त 19 वर्षांच्या वयात ती एका मुलीची आई बनली.

Photo Credit; instagram

मुलगी झाल्यानंतर तिला जीवन जगण्याचा नवा मार्ग मिळाला. ती एक चांगली बायको होण्याचा खूप प्रयत्न करत होती. मात्र, दोघांमध्ये मोठं अंतर निर्माण झालं आणि तिचं ते लग्न मोडलं.

Photo Credit; instagram

एका रात्री रुखसारने तिचं सामान पॅक केलं आणि आपल्या 8 महिन्याच्या मुलीसोबत सासर सोडून बाहेर निघाली. त्यावेळी ते करणं योग्य होतं की नाही? हे तिला कळत नव्हतं.

Photo Credit; instagram

नवी सुरूवात करण्यासाठी रामपुरच्या तिच्या घरी गेली. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला काही प्रश्न न विचारता मुलीला दिलासा दिला. त्यानंतर, अभिनेत्रीने एक लहान गारमेंट बुटीक सुरू केलं मात्र, त्या कामात ती खुश नव्हती.

Photo Credit; instagram

त्यानंतर स्वत:च्या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोडून ती स्वत: ला शोधण्याच्या प्रयत्नात बाहेर पडली. 2005 मध्ये जवळपास 10 वर्षांनी तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

Photo Credit; instagram

त्यावेळी अगदी लहान रोल, ऑडिशन्स, रिजेक्शन्स या सगळ्यांतून ती गेली. पीके, सरकार, उरी, 83 अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने काम केलं. यादरम्यान, तिचं फारुख कबीर नावाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं.

Photo Credit; instagram

यानंतर, दोघांचं लग्न झालं मात्र 13 वर्षांनंतर हे नातं मोडलं. या दु:खात तिच्या मुलीने रुखसारला साथ दिली. एक वेळ तरक अशी आली होती, जेव्हा रुखसारला वाटलं की सगळं संपलं.

Photo Credit; instagram

मात्र, तिच्या अभिनयावरच्या प्रेमाने तिला जीवनात पुढे जाण्याचं बळ दिलं. आता ती टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचं दिसून येतंय.

पुढील वेब स्टोरी

डोळ्यातच दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं? जाणून घ्या कसं ओळखायचं?

इथे क्लिक करा