करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आधीच विवाहित? TV शोवर झाला खुलासा...
Photo Credit; instagram
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे. नुकतंच, करण आणि तेजस्वी 'पती, पत्नी और पंगा'च्या सेटवर पोहोचले.
Photo Credit; instagram
'पती, पत्नी और पंगा'चा एक प्रोमो समोर आला असून त्यात अभिषेक, करण आणि तेजस्वी शोमध्ये असलेल्या एका हसीनाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
त्यावेळी, अभिषेक करणला म्हणतो की "भावा, माझं तिच्याशी बोलणं करुन दे." यावर करण म्हणतो की "हा प्रत्येक वेळी शोमध्ये माझ्या मागे लागतो."
Photo Credit; instagram
तेव्हा करण तिथल्या मॉडलला म्हणतो की "मॅरी, हा माझा लहान भाऊ आहे." यावर "तेजस्वी लगेच उत्तर देते की मी करणची बायको आहे."
Photo Credit; instagram
तेजस्वीचं हे बोलणं ऐकून सगळे सरप्राइज्ड होतात. त्यामुळे, प्रोमो बघून चाहत्यांना धक्का बसला आणि या विचारात पडले की खरंच, करण आणि तेजस्वीचं लग्न झालं आहे का?
Photo Credit; instagram
यावर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं की "ही जोडी खरंच हिट आहे." तर दुसऱ्याने लिहिलं की "करण कुंद्रा रॉकस्टार आहे."
Photo Credit; instagram
खरंतर, करण आणि तेजस्वीचं अजून लग्न झालं नसून शोमध्ये तेजस्वी केवळ मस्करीमध्ये ती करणची बायको असल्याचं म्हणाली.