बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच आता बाप होणार आहे. त्याच्या घरी आता नवा पाहुणा येणार असून पत्नी नताशा गर्भवती असल्याचा फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
फोटोमध्ये वरुण पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये 'हम प्रेग्नेंट हैं' असं लिहिलं आहे.
वरुण आणि नताशाने शेअर केलेला हा फोटो त्याच्या खोलीतील आहे. त्याच्यासोबत त्याचा पाळीव कुत्राही दिसत आहे.
वरुण 36 वर्षी बाप बनणार असल्याने तो कमालीचा आनंदी दिसून येत आहे. त्याच्या आणि नताशाच्या लग्नाला काही आठवड्यांपूर्वीच 3 वर्षे पूर्ण झाली आहेत.
वरुणने नताशासोबत लग्न केले होते, तेव्हाही नताशाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या अनेकदा छापून आल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्या बातम्यांमधून काही तथ्य नसल्याचंच सिद्ध झालं आहे.
आता वरुणनेच त्याच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली असून त्याच्या या गोष्टीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येणारं बाळ हे गुडविल घेऊन येणार अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार वरुण आणि नताशाचे अभिनंदन करत आहेत. अर्जुन कपूरने त्यांचं अभिनंदन केलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
विकास दिव्यकीर्ती यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण?