Isha Deol: 'भरत नाराज आणि रागात असायचा...' ईशाने पतीबद्दल नेमकं काय सांगितलं?
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती.
Photo Credit; instagram
ईशा आणि भरत यांचे २०१२ साली लग्न झाले. मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. या कपलला राध्या (7) आणि मिराया (5) अशा दोन मुली आहेत.
Photo Credit; instagram
घटस्फोटाबद्दल सांगताना, ईशा देओल आणि भरत यांनी त्यांच्या दोन्ही मुलींची काळजी कोण घेणार हे सांगितले आहे.
Photo Credit; instagram
त्यांनी जॉइंट पोस्टमध्ये लिहिले की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात आम्ही आमच्या दोन्ही मुलांच्या हिताचा विचार केला आहे.'
Photo Credit; instagram
ईशा देओलच्या मुली राध्या आणि मिराया लाइमलाइटपासून दूर राहतात. लग्नाच्या 5 वर्षानंतर, अभिनेत्रीने 2017 मध्ये मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मुलगी राध्याला जन्म दिला. यानंतर 2019 मध्ये मुलगी मिरायाचा जन्म झाला.
Photo Credit; instagram
2020 मध्ये प्रकाशित झालेल्या ईशाच्या 'अम्मा मिया' पुस्तकात तिने खुलासा केला होता की, त्यांच्या लहान मुलीच्या जन्मानंतर भरतला एकटेपणा जाणवू लागला होता.
Photo Credit; instagram
पुस्तकात ईशाने असंही लिहिलं आहे की, 'भरत नाराज आणि रागात असायचा, कारण त्याला वाटायचे मी त्याला वेळ देत नाही. हे लक्षात आल्यानंतर मी आमच्या नात्यावर काम केले.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Isha Deol आणि भरत तख्तानीचा घटस्फोट, 11 वर्षांचा मोडला संसार!