Photo Credit; instagram

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता लग्नाच्या बेडीत... होणारी बायकोसुद्धा सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार

Photo Credit; instagram

मराठी मालिकाविश्वातून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'लक्ष्मी निवास' या सुप्रसिद्ध मालिकेतील मुख्य अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Photo Credit; instagram

मेघन मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिच्यासोबत संसार थाटणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याची घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

अनुष्का आणि मेघनने एकमेकांच्या हातात अंगठी घातलेला फोटो सुद्धा इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

त्याचबरोबर अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि मेघनचा एक क्लोझ फोटो सुद्धा शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

'रंग माझा वेगळा' या मालिकेदरम्यान अनुष्का आणि मेघनची एकमेकांसोबत ओळख झाल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, मेघनने 'रंग माझा वेगळा', 'सास बिना ससुराल' यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Photo Credit; instagram

तसेच, अनुष्का ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या आरुषीची भूमिका साकारत असून तिने 'आई -मायेचं कवच' आणि 'अल्याड पल्याड' या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

पुढील वेब स्टोरी

नदीच्या किनारी रिंकू राजगुरूचं स्टायलिश फोटोशूट! नेटकरी म्हणाले की....

इथे क्लिक करा