Photo Credit; instagram

सागरिकाने शेअर केले झहीरसोबतचे रोमॅन्टिक फोटोज, बर्थडेचं खास सेलिब्रेशन

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध गोलंदाज झहीर खान याचा काल (7 ऑक्टोबर) रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.

Photo Credit; instagram

झहीर खान याची पत्नी सागरिका घाटगे हिने इंस्टाग्रामवर झहीर खानसोबतचे काही फोटो शेअर करत झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सागरिकाने लिहिलं की "माझ्या सर्वात चांगल्या मित्राला, बेस्ट वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे की तू माझा नवरा आहेस. खरंतर, तू माझं संपूर्ण जग आहेस."

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये झहीर आपली पत्नी आणि मुलांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

सागरिकाने शेअर केलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोज पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव केला.

Photo Credit; instagram

झहीर खानच्या वाढदिवसाचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

46 व्या वर्षी राखी सावंत करणार तिसरं लग्न? नेमकं काय म्हणाली?

इथे क्लिक करा