Photo Credit; instagram

'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!

Photo Credit; instagram

शाइनी दोशी हिने 2013 मध्ये संजय लीला भंसाली यांच्या सरस्वतीचंद्र टिव्ही सीरिजमधून आपल्या करिअरची सुरूवात केली. तिचं बालपण बऱ्याच समस्यांनी भरलं असल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

शाइनी लहान असताना तिच्या वडिलांनी तिच्या आईला आणि तिच्या बहिणीला सोडून दिलं होतं. त्यामुळे तिला तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकर काम करण्यासाठी सुरूवात करावी लागली.

Photo Credit; instagram

त्यामुळे फक्त आर्थिक ओझंच नव्हे तर ती मोठ्या मेंटल ट्रॉमामधून जात होती. शाइनीने सिद्धार्थ कननशी झालेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. यावेळी शाइनी भावनिक झाली आणि रडू लागली.

Photo Credit; instagram

त्यावेळी अश्रू रोखून, तिच्या तरुणपणीचा एक खूप दुःखी करणारा तिने सांगितला. ती म्हणाली- "माझे वडील मला वेश्या म्हणायचे."

Photo Credit; instagram

"अहमदाबादमध्ये माझे प्रिंट शूटिंग कधीकधी पहाटे 2 ते 3 वाजेपर्यंत चालायचे. माझी आई नेहमीच माझ्यासोबत असायची. मी फक्त 16 वर्षांची होते. पण आम्ही घरी परतल्यानंतर आम्ही सुरक्षित आहोत का? असे विचारण्याऐवजी तो आरोप करायचे."

Photo Credit; instagram

ते म्हणायचे, "तु आपल्या मुलीला पहाटे 3 वाजता बाहेर घेऊन जात आहेस? तू तिला वेश्या बनवतेस का? त्यांची भाषा खूप वाईट होती." असं शाइनी म्हणाली.

Photo Credit; instagram

त्यावेळी तिने तिच्या वडिलांना माफ केलं का? असं तिला विचारण्यात आलं. यावर शाइनीने हे मान्य केलं आणि म्हणाली, "या जीवनाच्या गाठी आहेत ज्या उलगडता येत नाहीत."

Photo Credit; instagram

शाइनी पुढे म्हणाली, "आताही कधीकधी मला खूप एकटं वाटतं. मला कधीच असे वडील मिळाले नाहीत जे मला आधार देऊ शकतील, त्यामुळे 'मी तुमच्यासाठी इथे आहे' असं म्हणते."

Photo Credit; instagram

2019 मध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान शाइनीच्या वडिलांचे निधन झाले. तोपर्यंत, ते दोन वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते. ही गोष्ट तिला सतत त्रास देत राहते. "एक अपराधीपणाची भावना कायम आहे" असं ती म्हणाली.

पुढील वेब स्टोरी

आंबा कापायचा पण नाही, तरी 2 सेकंदात समजेल गोड की आंबट!

इथे क्लिक करा