हे आहेत नाव बदलणारे सेलिब्रिटी, खरी नावं पाहून तुम्हालाही...
Photo Credit: instagram
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी असे आहेत की, आपण आज त्यांना ज्या नावाने ओळखतो ती नावं त्यांची खरी नावं नाहीत. म्हणजे त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांची नावं वेगळी होती. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी किंवा नंतर काही सेलिब्रिटींनी आपली नावं बदलली. कोण आहेत हे सेलिब्रिटी ते आपण पाहूया.
Photo Credit: instagram
अमिताभ बच्चन यांचे पहिले नाव इंकलाब श्रीवास्तव होते. पण नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव बदलून अमिताभ बच्चन असे ठेवले.
Photo Credit: instagram
लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव बेगम मुमताज होते.
Photo Credit: instagram
दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. पण नंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार असे ठेवले.
Photo Credit: instagram
अभिनेत्री रेखा हिचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे. पण तिने तिचे नाव लहान करून रेखा ठेवले.
Photo Credit: instagram
राजेश खन्ना यांचे खरे नाव जतीन खन्ना होते. जे नंतर त्याने राजेश असे बदलले.
Photo Credit: instagram
कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टर्कोट आहे. पण नंतर तिने तिचे आडनाव बदलले.
Photo Credit: instagram
खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे.
Photo Credit: instagram
श्रीदेवी हिचे खरे नाव श्री अम्मा यंगर अयप्पन होते. पण हे नाव खूप होतं. त्यामुळे तिने स्वत:साठी साधे आणि छोटं असं नाव म्हणजेच श्रीदेवी निवडलेलं.