Photo Credit; instagram

जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?

Photo Credit; instagram

सलमान खानच्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे. यावर्षीच्या सीझनची थीमसुद्धा वेगळी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Photo Credit; instagram

'बिग बॉस'च्या घरातील सदस्य नेमके कोण असणार आहेत? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. यादरम्यान, शोच्या कन्टेस्टन्टशी संबंधित एक नवी माहिती समोर आली आहे.

Photo Credit; instagram

रिपोर्ट्सनुसार, माजी क्रिकेटर संजय बांगरची मुलगी अनाया बांगर 'बिग बॉस' शोमध्ये सहभागी होऊ शकते. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, या शोच्या निर्मात्यांनी अनायाला शोमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर केलं.

Photo Credit; instagram

अनाया एक ट्रान्सजेंडर वुमन असून ती जेंडर ट्रान्फॉर्मेशन करुन मुलापासून मुलगी बनली. तिची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

'बिग बॉस 19' मध्ये अनायाचा सहभाग असणार आहे की नाही? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, ती या शोमध्ये सहभागी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Photo Credit; instagram

अनायाव्यतिरिक्त, रॅपर रफ्तार देखील या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तसेच, यामध्ये धनश्री वर्माचं सुद्धा नाव समोर येत आहे.

Photo Credit; instagram

'बिग बॉस 19', मध्ये सलमान खानसोबत दोन आणखी होस्ट सहभागी होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

पुढील वेब स्टोरी

फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...

इथे क्लिक करा