Arrow

भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय?

Arrow

उत्तर प्रदेशसह अनेक भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल  होती.

Arrow

उत्तर प्रदेशातील जोरदार भूकंपामुळे इमारती हादरल्याचा व्हिडीओही आता समोर आला आहे. 

Arrow

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरतात.तो शोध  1935 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ चार्ल्स रिक्टर आणि बेनो गुटरबर्ग यांनी लावला.

Arrow

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरतात. त्यावेळी भूकंपाची तीव्रता एका विशिष्ट संख्येने दाखवण्याची होती, त्यामुळे इतर भूकंपांशी तुलना करता आली.

Arrow

0 ते 1.9 रिश्टर स्केलचे भूकंप सौम्य असतात आणि ते फक्त सिस्मोग्राफद्वारे ओळखले जातात.

Arrow

2 ते 2.9 रिश्टर स्केलवर भूकंप होतो तेव्हा थोडे कंपन झाल्यासारखे वाटते.

Arrow

रिश्टर स्केलवर 3 ते 3.9 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर अवजड वाहन गेल्याचा भास होतो.

Arrow

4 ते 4.9 रिश्टर स्केलवर भूकंप झाल्यानंतर घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटतात आणि भिंतींवरील साहित्य पडू शकते.

Arrow

5 ते 5.9 रिश्टर स्केलवर भूकंप होतो तेव्हा घरातील फर्निचर आणि इतर मोठ्या वस्तूदेखील हलू शकतात.

Arrow

6 ते 6.9 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे इमारतींना तडे जाऊ शकतात. वर असलेल्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.

Arrow

7 ते 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर मात्र इमारती कोसळणे, जमिनीखालची पाईपलाईन फुटणे असं प्रकार घडतात.

Arrow

8 ते 8.9 तीव्रतेचा भूकंप होतो तेव्हा इमारती, बांधलेले पूलही कोसळू लागतात.  

Arrow

भूकंप 9 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपामुळे सर्व विध्वंस होण्याची शक्यता असते.

‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा