Arrow

वय अवघं 18, 77 देशांच्या कंटेस्टंटचा पराभव, अन् अशी बनली सु्ष्मिता सेन मिस युनिवर्स

Arrow

सुष्मिता सेनसाठी आजचा दिवस खुप महत्वाचा आहे. कारण 29 वर्षापुर्वी आजच्याच दिवशी ती मिस युनिवर्स बनली होती.

Arrow

21 मे 1994 रोजी सुष्मिता सेनने 77 देशांचा कंटेस्टंट्सचा पराभव करून मिस युनिवर्सचा किताब जिंकला होता. 

Arrow

आजच्या या दिवसानिमित्त सुष्मिता सेनने स्पेशल पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने मिस युनिवर्सच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Arrow

सुष्मिता सेनने 29 वर्षापुर्वीची तिची थ्रोबॅक फोटो शेअर केली. या फोटोत ती शॉर्ट हेयरमध्ये दिसली होती.

Arrow

तसेच चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिने कॅमेरासमोर पोज दिला होता. या फोटोच्यावेळी सुष्मिता 18 वर्षाची होती.

Arrow

या फोटोच्या कॅप्शनला सुष्मिता सेन लिहते, हा फोटो 29 वर्ष जुना असून प्रसिद्ध फोटोग्राफऱ  Prabuddha Dasgupta यांनी क्लिक केला होता. 

Arrow

हा फोटो काढताना कॅमेरामन म्हणाला की, तू पहिली मिस युनिवर्स आहेत, जिचे मी फोटोशूट केले आहे.

Arrow

कॅमेरामनच्या या प्रतिक्रियेवर सुष्मिता सेन म्हणाली, मी भारताची पहिली मिस युनिवर्स आहे. 

Arrow

देशाचे प्रतिनिधित्व करून जिंकणे खुप मोठी गोष्ट आहे. आज 29 वर्षानंतर देखील माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत.

Arrow

या दिवसाचा मला अभिमान. कारण इतिहास साक्षी आहे, फिलीपिन्समध्ये 21 मे 1994 रोजी भारताने पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.

Arrow

सुष्मिता सेन तिच्या प्रोफेशनल लाईफसह लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असते.

मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॅकलेस अवतार, ऐश्वर्या नारकरचा हॉट लुक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा