चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार, 'या' राशीतील लोकांना मिळणार मोठं यश, फक्त 'हे' करा
मुंबई तक
• 01:35 PM • 08 Jan 2026
astrology : आज बुधवार, 8 जानेवारी रोजी ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींचे भविष्य पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

1/5
आज बुधवार, 8 जानेवारी रोजी ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मेष राशीत असणार आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे. खाली काही राशींचे भविष्य नमूद करण्यात आले आहे.

2/5
मेष राशी :
या राशीतील लोकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे, आज सरकारी कामात अधिकाऱ्यांशी वाद होण्याची अधिक चिन्हे आहेत. गुंतवणूक करण्याचा विचार केला असल्यास लगेचच निर्णय घेऊ नका. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांसोबत फिरायला जाल, सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

3/5
वृषभ राशी :
या राशीतील लोकांना सततची चिंता सतावेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अनावश्यक खर्चांपासून सावध राहावे. आर्थिक परिस्थितीची चिंता सतावू शकेल. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील, तसेच अडकलेले पैसे मिळतील.

4/5
वृश्चिक राशी :
आजचा दिवस वृश्चिक राशीतील लोकांसाठी खास असेल. नोकरदारांना त्यांच्या सहकाऱ्यांच्या आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. आज रागावर नियंत्रण ठेवावं, अन्यथा काम वेळेवर पूर्ण होणार नाही.
ADVERTISEMENT

5/5
कुंभ राशी :
कुंभ राशीतील लोकांचे पैसे खर्च होतील असं राशीभविष्य सांगतं. आज प्रलंबित राहिलेले कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत खरेदीला जाण्याची संधी मिळेल. तुमचे पैसे खर्च होतील. व्यस्त कामातूवन स्वत:साठी वेळ काढणं अवघड होईल. सरकारी नोकरीशी संबंधित प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT










