मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश! 'या' राशींच्या लोकांच्या आर्थिक अडचणी वाढणार... कोणते उपाय करावेत?
मुंबई तक
• 10:07 AM • 20 Feb 2026
ज्योतिषशास्त्रात प्रबळ मानला जाणारा मंगळ ग्रह 23 फेब्रुवारी 2026 रोजी मकर राशी सोडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे काही राशींना आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/7
ज्योतिषशास्त्रात प्रबळ मानला जाणारा मंगळ ग्रह 23 फेब्रुवारी 2026 रोजी मकर राशी सोडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच, बुध, शुक्र, सूर्य आणि राहू हे आधीच कुंभ राशीत असल्याने "चतुर्ग्रही योग" निर्माण होतो. या युतीमुळे काही राशींना आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

2/7
सिंह: सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात या मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे आव्हाने येऊ शकतात . थोडा निष्काळजीपणा देखील तुमच्या मेहनतीला बाधा आणू शकते. या राशीच्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, मोठी संधी हुकण्याचा धोका आहे. त्यामुळे, संयम बाळगा आणि कामाच्या ठिकाणी संघर्ष टाळण्याचा सल्ला देण्यात आहे.
ADVERTISEMENT

3/7
आर्थिक अडचणींबरोबरच, सिंह राशीच्या लोकांच्या वैयक्तिक नातेसंबंधांवरही मंगळाचा प्रभाव जाणवेल. जोडीदारासोबत मतभेद वाढू शकतात आणि घरातील अडचणीच्या परिस्थितीमुळे मानसिक अवस्था बिघडू शकते. या काळात केवळ समजूतदारपणा आणि संयमच तुमची परिस्थिती बिघडण्यापासून रोखू शकतो.

4/7
कुंभ: मंगळ कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे तुमचा हट्टीपणा आणि राग वाढू शकतो. घाईघाईने घेतलेले कोणत्याही आर्थिक निर्णयामुळे तुमची तिजोरी रिकामे होऊ शकते. मौल्यवान वस्तू, विशेषतः सोने आणि चांदीचे दागिने सुरक्षित ठेवा, कारण त्या हरवण्याचा किंवा चोरीला जाण्याचा धोका आहे.
ADVERTISEMENT

5/7
या काळात, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. कारण, अपघात होण्याची शक्यता आहे. इतरांच्या वादात ढवळाढवळ केल्याने तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. प्रगतीच्या शोधात धोकादायक गुंतवणूक (शॉर्टकट) करणे टाळा, कारण तुमचे पैसे बुडण्याची शक्यता आहे.

6/7
मीन: मीन राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहण्याची ही वेळ आहे. खर्चात अचानक वाढ झाल्यामुळे तुमचे बँक बॅलन्स कमी होऊ शकते. जर कोर्ट केस प्रलंबित असेल तर निकाल तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. लपलेले शत्रू सक्रिय असतील आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात.
ADVERTISEMENT

7/7
मंगळ ग्रहाच्या गोचरच्या काळात या तीन राशींच्या लोकांनी काही खास उपाय करायला हवेत. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण करा. तसेच, शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तीळ घालून दिवा लावा. हे उपाय मंगळ आणि शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रभावी मानले जातात. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल.
ADVERTISEMENT










