Astrology : बुध-शुक्राची उलटी चाल, 'या' राशींची वाढणार डोकेदुखी

मुंबई तक

08 Oct 2026 (अपडेटेड: 08 Oct 2026, 01:39 PM)

Astrology : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना खूप महत्त्वाचे मानले जाते. ऑक्टोबर 2026 मध्ये, दोन प्रमुख ग्रह त्यांच्या हालचाली बदल घडवूण आणणार आहेत. धन, समृद्धी आणि आनंदाचा ग्रह असलेला शुक्र आधीच वक्री झाला आहे. त्यानंतर ज्ञान, व्यवसाय आणि वाणीचा ग्रह असलेला बुध देखील वक्री होईल. दोन्ही ग्रहांच्या वक्री गतीचा परिणाम हा करिअर, व्यवसाय आर्थिक परिस्थितीत आणि नातेसंबंधावर होण्याची शक्यता आहे.  द्रिक पंचांगानुसार, शुक्र हा 3 ऑक्टोबर 2026 रोजी वक्री होईल, तर बुध ग्रह हा 24 ऑक्टोबर 2026 रोजी वक्री होईल. परिणामी दोन्ही ग्रह हा संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर वक्री राहतील. या काळात काही राशींना विशेष सावधानता बाळगावी. 

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना खूप महत्त्वाचे मानले जाते. ऑक्टोबर 2026 मध्ये, दोन प्रमुख ग्रह त्यांच्या हालचाली बदल घडवूण आणणार आहेत. धन, समृद्धी आणि आनंदाचा ग्रह असलेला शुक्र आधीच वक्री झाला आहे. त्यानंतर ज्ञान, व्यवसाय आणि वाणीचा ग्रह असलेला बुध देखील वक्री होईल. दोन्ही ग्रहांच्या वक्री गतीचा परिणाम हा करिअर, व्यवसाय आर्थिक परिस्थितीत आणि नातेसंबंधावर होण्याची शक्यता आहे.  द्रिक पंचांगानुसार, शुक्र हा 3 ऑक्टोबर 2026 रोजी वक्री होईल, तर बुध ग्रह हा 24 ऑक्टोबर 2026 रोजी वक्री होईल. परिणामी दोन्ही ग्रह हा संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर वक्री राहतील. या काळात काही राशींना विशेष सावधानता बाळगावी. 
 

Astrology

2/5

मेष 

मेष राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात लोकांसाठी आर्थिक परिस्थितीत आव्हानात्मक स्थिती असू शकते. खर्चात अनाचकपणे वाझ झाल्याने त्यांच्या बजेटवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना सहकारी आणि वरिष्ठांशी बोलताना सावधानता बाळगावी.

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीचा अधिपती म्हणून ग्रह बुध आहे. बुधाच्या वक्री गतीला या राशीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कामातील अगदली लहानसा निष्काळजीपणा समस्या निर्माण करेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा निर्णय सध्या पुढे ढकलणे उत्तम राहील. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या वक्री गतीचा परिणाम होईल. या काळात कामाचा ताण आणि दबाव निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत गैरसमज होण्याची अधिक शक्यता आहे. व्यवसायिकांनी पैशांच्या बाबतीत जोखमी टाळावी. 
 

Astrology

5/5

तूळ 

तूळ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रहाची वक्री ही गतीमुळे, राशीतील व्यक्तींना त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल.  नात्यातील संवेदनशीलता वाढेल. आपल्या जवळच्या लोकांशी संवाद साधताना संयम बाळगावा.   
 

हे वाचलं का?