Astrology : शनिदेवाची पुढे वाटचाल, 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू
मुंबई तक
• 12:48 PM • 09 Oct 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देवाला न्यायाची देवता मानली जाते, जो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा शनीचे भ्रमण बदलते, तेव्हा त्याचा थेट परिणाम हा करिअर, आर्थिक स्थिती आणि मानसिक शांतीवर होतो. सध्या शनी ग्रह हा मीन राशीत वक्री होणार आहे, ज्यामुळे तणाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ADVERTISEMENT


1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देवाला न्यायाची देवता मानली जाते, जो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा शनीचे भ्रमण बदलते, तेव्हा त्याचा थेट परिणाम हा करिअर, आर्थिक स्थिती आणि मानसिक शांतीवर होतो. सध्या शनी ग्रह हा मीन राशीत वक्री होणार आहे, ज्यामुळे तणाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


2/7
11 डिसेंबर 2016 रोजी शनीच्या स्थितीत एक मोठा बदल होणार आहे. 65 दिवसांच्या वक्री कालावधीत, शनी पुन्हा मार्गी गतीत येईल. अनेक राशींसाठी, शनीचा मार्गी गती अडथळे दूर करून प्रगतीचे नवीन मार्ग खुले करेल.
ADVERTISEMENT


3/7
वृषभ
वृषभ राशीसाठी शनीची मार्गी गती जीवनदायी ठरेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील आणि व्यावसायिकांना नवीन व फायदेशीर संधी मिळू शकतील. आर्थिक बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा होईळ आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकेल.


4/7
मिथुन
शनिदेवांच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळण्याती शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा अधिकचा विचार करत असाल, तर आपली इच्छा पूर्ण होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होईल, आर्थिक लाभाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/7
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी, कामाच्या ठिकाणी स्वत:ची एक ओळख निर्माण करण्याची वेळ आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होईल आणि पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाय एखाद्या जुन्या व्यवसायिक करारातून किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत प्रबळ आहेत.


6/7
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी, शनीच्या मार्गी भ्रमणामुळे करिअर आणि आर्थिक दोन्ही बाबतीत दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी असलेला अनावश्यक ताण दूर होईल आणि व्यवसायात नफा वाढेल.
ADVERTISEMENT


7/7
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक स्थैर्याबाबत, तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालण्याची संधीही मिळेल.
ADVERTISEMENT








