Astrology : नवरात्रीदरम्यान चार ग्रहांची वक्री गती, 'या' राशींचे भाग्य बदलेल

मुंबई तक

• 12:29 PM • 14 Oct 2026

Astrology : देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून हा पवित्रण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा शुभ सण केवळ देवी पूजेपुरता न मर्यादीत राहता ज्योतिषशास्त्रानुसार, अत्यंत विशेष मानला जातो. आकाशातील ग्रहांची हालचाल कशा प्रकारे बदलते, तसेच महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ निर्णय एकाच वेळी जुळून येत आहेत. 

Google CTA
Astrology

1/5

देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून हा पवित्रण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा शुभ सण केवळ देवी पूजेपुरता न मर्यादीत राहता ज्योतिषशास्त्रानुसार, अत्यंत विशेष मानला जातो. आकाशातील ग्रहांची हालचाल कशा प्रकारे बदलते, तसेच महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ निर्णय एकाच वेळी जुळून येत आहेत. 
 

Astrology

2/5

हिंदू पंचागानुसार, सध्या चार प्रमुख ग्रह वक्री आहेत. यात मीन राशीतील शनी, तूळ राशीतील शुक्र, कुंभ राशीतील राहू आणि सिंह राशीतील केतू यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे चारही ग्रह संपू्र्ण नवरात्रोत्सवात वक्री अवस्थेत राहतील. 
 

Astrology

3/5

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी यंदाचा नवरात्रोत्सव वरदान ठरत आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्कृष्ट संधी मिळतील. आर्थिक अडचणींशी झगडणाऱ्यांच्या समस्या अधिक कमी होण्याची शक्यता आहे.

Astrology

4/5

मिथुन 

मिथुन राशी ही एकूण राशींपैकी भाग्यवान राशी आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी आपले काम पाहून पुढे दखल घेतली जाईल. घाईने घेतलेले निर्णय आयुष्यात नुकसानीस कारणीभूत ठरतील. 
 

Astrology

5/5

सिंह आणि तूळ

सिंह आणि तूळ या दोन्ही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना त्यांचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. कामातील तुमची मेहनत तुमचे वरिष्ठ प्रशंसा करण्यास तत्पर असतील, ज्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण होईल.   
 

हे वाचलं का?